29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeजागतिकबिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला धोका, 74 हजार लोकांचे स्थलांतरण

बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला धोका, 74 हजार लोकांचे स्थलांतरण

बिपरजॉय चक्रीवादळ हे अरबी समुद्रात निर्माण झालेले वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकलं आहे. हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. वादळाने अत्यंत तीव्र रौद रुप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं योग्य ती खबरदारी घेतली आहे. किनाराऱ्यावरील भागातील जवळपास 74 हजार लोकांना सुरक्षास्थळी हलवले आहे. किनारपट्टीजवळ एनडीआरएफची 33 पथके तैनात करण्यात आली आहे. गुजरातमध्ये बुधवारी अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. मुंबईच्या सार्वजनिक समुद्रकिनाऱ्यांवर 120 जीवरक्षक नेमण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे.

गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या कच्छ, सौराष्ट्र प्रदेश, मांडवी किनारा आणि पाकिस्तानमधील कराची जवळून जाणार आहे. वाऱ्याचा वेग हा 125 ते 135 किमी पर्यंत जाऊ शकतो. वादळ आणि मुसळधार पावसाचा बसू नये गुजरात सरकारने तयारी केली आहे. कच्छ जिल्ह्यात सुमारे 34300 लोकांना, जामनगरमध्ये 10,000, मोरबीमध्ये 9,243, राजकोटमध्ये 6,089, देवभूमी द्वारकामध्ये 5,035, जुनागढमध्ये 4,604, पोरबंदर जिल्ह्यात 3,469 आणि सोमनाथ जिल्ह्यात 5,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

हे सुध्दा वाचा :

टाळचिपळ्यांच्या गजरात माऊलींची पालखी दिवेघाटाकडे रवाना ;सासवडमध्ये करणार मुक्काम

शिवकृपा पतपेढीवर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन पुढे सरकलं, गुजरातकडे कूच

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे पुढील तीन दिवस विमानसेवेवरही परिणाम होईल. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कच्छमध्ये बुधवारी 3.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. लष्कर, नौदल आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) देखील मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहेत, अशी माहिती मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी