मुंबई

बदली प्रमाणपत्राशिवायही शाळांमध्ये मिळणार प्रवेश; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांमध्ये प्रवेश देताना जुन्या शाळेतील बदली प्रमाणपत्राचा आग्रह धरू नये, असा महत्वपूर्ण आदेश राज्य सरकारद्वारे देण्यात आला आहे. कोविड काळात आणि त्यानंतर सुद्धा कमी होत चाललेली विद्यार्थी संख्या पाहता, विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत घेण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शाळांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. जुन्या शाळा सोडून इतर शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘ट्रान्सफर सर्टिफिकेट’ (टीसी) देण्यास शाळा नकार देत असल्याचे आढळून आले आहे. फी न भरल्याने काही खासगी शाळांनी टीसी देण्यास नकार दिला आहे. केवळ टीसी न मिळाल्याने शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका यामुळे आताचे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

जन्म प्रमाणपत्रावर मिळेल शाळेत प्रवेश
केवळ टीसी नसल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रोखू नयेत, असे स्पष्ट शब्दांत शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. राज्यभरातील प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेतील कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सहज प्रवेश घेऊ शकतील. शासन आदेशानुसार विद्यार्थ्याचा जन्म दाखला पाहून त्यांच्या वयानुसार त्या विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश देण्यात यावा. शिक्षण हक्क कायद्यात याची तरतूद आहे.

या आदेशाची अंमलबजावणी कशी होणार ?
कोविड कालावधीनंतर एखाद्या खाजगी शाळेने हस्तांतरण (TC) किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट (LC) देण्यास नकार दिल्यास, सामान्यतः सरकारी शाळा किंवा अनुदानित शाळा त्याला प्रवेश देऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा शासन आदेश काढण्यात आला आहे.

कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये, तो शाळेपासून वंचित राहू नये याबाबतची जबाबदारी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकाची असेल. त्याचे पालन न केल्यास दोघांवर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत आणखी एका अश्लील चित्रपटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

ऑलम्पिक चॅम्पियनचा पराभव कर मीराबाई चानूने रचला इतिहास

पुढील 24 तासांत परिस्थितीत सुधारली नाही तर…; कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवार आक्रमक

सरकारी पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती नोंदवून विद्यार्थ्यांची नवीन शाळा जुन्या शाळेकडून टीसी मागवेल. सात दिवसांत त्याची पूर्तता न केल्यास जुन्या शाळेच्या संस्थाचालक/मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

दरम्यान, बहुतांश वेळा शाळेत प्रवेश घेताना जुन्या शाळेतून विद्यार्थ्याला बदली प्रमाणपत्र म्हणजेच टीसी किंवा शाळा सोडल्याचा दाखला न मिळाल्याने विद्यार्थ्यांना नवीन शाळेत प्रवेश घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शाळा सुरु होऊन देखील या प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ज्यामुळे राज्य सरकारने या महत्वपूर्ण निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्याचा आदेश लागू केला आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

18 mins ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

44 mins ago

त्र्यंबकमध्ये उटीची वारी सोहळा उत्साहात

चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला (Ooty's wari) विशेष महत्व आहे. मंदिर परिसर…

1 hour ago

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सिडको भागामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा

नासिक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) वतीने संपूर्ण नाशिक शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीय…

1 hour ago

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

17 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

18 hours ago