मुंबई

Ashok Chavan’s video : ‘कोरोना’शी लढत असलेल्या अशोक चव्हाण यांनी रूग्णालयातून जारी केला व्हिडीओ संदेश

टीम लय भारी

मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रूग्णालयातूनच त्यांनी काँग्रेसच्या ‘स्पीक अप इंडिया’या ( Ashok Chavan participates in Speak up India campaign ) मोहिमेत सहभाग घेतला आहे.

हे सुद्धा वाचा : ‘काँग्रेस’च्या मंत्र्यांना ‘कोरोना’

या मोहिमेंअंतर्गत चव्हाण यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे ( Ashok Chavan released a video). या व्हिडीओ संदेशात ते म्हणतात की, सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियंका गांधी – वढेरा यांनी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहीम हाती घेतली आहे. लाखो देशवासियांच्या भावना बुलंद करण्यासाठी मी सुद्धा मुंबईत एका रूग्णालयातून या मोहिमेत सहभागी होत आहे. ‘कोरोना’शी लढत असतानाही मी या मोहिमेत सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा : ‘कोरोना’ग्रस्त मंत्र्यांना मुंबईत हलविण्याची शक्यता, सचिव सुद्धा झाले ‘कॉरन्टाईन’

ते पुढे म्हणाले की, ‘लॉकडाऊन’मुळे सर्वात जास्त फटका सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, शेतमजूरांना आणि गरीबातील गरीब लोकांना बसला आहे. छोट्या व मध्यम उद्योगांना फटका बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने केंद्राला सुचना केल्या आहेत.

तुषार खरात

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

13 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago