मुंबई

“बाळासाहेब थोरातांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही”

टीम लय भारी

मुंबई : सध्या देशात केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून राजकीय वातवारण तापलेलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने देखील हे कायदे रद्द करण्याची मागणी करत, काल नागपुरात विधीमंडळास घेराव देत आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला आजा भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. “बाळासाहेब थोरातांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही” असं भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

“मागच्या पाच-सात वर्षात राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आडगळीला पडला होता. अपघाताने महाआघाडीच्या पाठीमागे उभा राहुन सत्तेत आला. एका वर्षात राज्यातील शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न निर्माण झाले. त्यासाठी सरकार अपयशी ठरलं असुन, मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता आली नाही. खरीपाचा विमा मिळालेला नाही. सोयाबीन निकृष्ट उगवले. हे सारे प्रश्न असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात केंद्रात सुरू असलेल्या कृषी कायद्याचा आधार घेवून भाजपावर टीका करतात हे हास्यास्पद आहे. खरं तर त्यांच्या नैतिक अधिकार नाही, कारण राज्यात शेतकरी खितपत ठेवला आणि आता मोर्चा काढून राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी ही मंडळी कृषी कायद्यात पराचा कावळा करत ओरडत आहेत.” अशी टीका राम कुलकर्णी यांनी केली आहे.

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नागपुरात जावून काल भाजपावर केलेली टीका म्हणजे बालीशपणाच होय. कारण, राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थोरत एक शब्दही बोलत नाहीत आणि कृषी कायद्यावर मात्र छाती फाडून बोलतात. यावरूनच शेतकऱ्यांविषयी किती नाटकी कळवळा सुरू आहे? हे लक्षात येतं. शिवसेना, राष्ट्रवादी व इतर सत्ताधारी नेते शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका करतात. मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत?” असा प्रश्न देखील भाजपाकडून विचारण्यात आला आहे.

तसेच, दिल्लीतील आंदोलन काँग्रेसची राजकीय खेळी असुन खरा शेतकरी यामध्ये सहभागी झालेला नाही. तरी सुद्धा केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी अशा आंदोलनाला फुस लावण्याचं काम काँग्रेस नेते करतात. राज्यात स्वाभिमानाने शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे नेते आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. यावर कोणताही शेतकरी नेता शिट्टी वाजवायला का तयार नाही? असा सवाल जनता विचारीत असल्याचंही भाजपा प्रवक्त राम कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

13 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

15 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

16 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

17 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

17 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

18 hours ago