उध्दव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी मातोश्री सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये जातात : आशिष शेलार

लय भारी न्यूज नेटवर्क 

मुंबई : मातोश्रीचा सन्मान ठेवून भाजपा नेते मातोश्रीवर राजकीय चर्चा करण्यासाठी जात असायचे. पण आता सत्तेच्या लालसेपोटी मातोश्री सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायला जात आहेत. अशी घणाघाती टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

संजय राऊत यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून शेलार यांनी शिवसेनेचा मोदींबदला आदर स्वाथी की नि:स्वार्थी; असा सवाल शिवसेनेला केला आहे.

शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेवर घणाघाती टीका केली. शेलार यांनी अमित शाह यांच्या मुलाखतीचा उल्लेख करत, त्यांनी मांडलेली भूमिका सत्य असल्याचं सांगितलं. “अमित शाह यांनी कोणाला खोटं पाडण्यासाठी नाही तर सत्य समोर आणण्याचं काम केलं आहे. अमित शाह यांनी मांडलेली भूमिका सत्य आहे. सत्य सांगितल्यावर काहींची अडचण होत असेल तर आम्ही काही करु शकत नाही. राजकीय स्वार्थापपोटी असत्य पसरवणं अमान्य आहे,” असं शेलार यांनी यावेळी म्हटलं.

संजय राऊत यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता कोणीतरी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर बोलताना शेलार यांनी विसंवाद निर्माण करण्याचं काम कोण करतं हे संपूर्ण महाराष्ट्र रोज सकाळी दूरचित्रवाणीवरुन पाहतो अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली.

तिन्ही पक्षांचं सुरु असलेलं नाटक महाराष्ट्राला अमान्य आहे. आहेत. मातोश्रीवरुन कोणी राज ठाकरेंनाही भेटायला जात नव्हतं. पण आता मातोश्री सोडून माणिकराव ठाकरे यांना भेटायला जात आहेत,” असा टोला शेलार यांनी लगावला.

राजीक खान

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

2 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

2 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

3 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

3 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

3 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

16 hours ago