मुंबई

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत “तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षण संपन्न”

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई: नशामुक्त भारत अभियान, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी मुंबई शहर, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, मुंबई शहर आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विद्यापीठ आयोजित “तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षण ” यांचे आयोजन ओल्ड कस्टम हाऊस, तळमजला, फोर्ट, मुंबई येथे २ मार्च २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते.(Expert Volunteer Training Completed” under Drug Free India Campaign)

उद्घाटक म्हणून मुंबई शहर चे जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी केले यांनी तज्ञ स्वंयसेवकाना व्यसनमुक्ती बद्दल मार्गदर्शन केले तसेच तज्ञ स्वंयसेवकाना व्यसनमुक्ती ची शपथ देण्यात आली. तसेच यावेळी तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शनासाठी नव निर्माण फाउंडेशन चे प्रमुख सल्लागार बॉस्को डिसोझा यांनी व्यसन आणि व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणार्यी प्रमुख पाहुणे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार चे वरिष्ठ राज्य समन्वयक स्पर्श महेश्र्वरी आणि प्रग्या जैन हे उपस्थित होते. यांनी तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षणाथीना नशामुक्त भारत अभियान मुंबई शहरात व्यसनमुक्ती वर प्रसार, प्रचार कशा प्रकारे करावे, पुढील नियोजन याबद्दल पीपीटी द्वारे माहिती देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

अबब ! दारूचा गैरधंदा करणारे २५ हजार जण अटकेत

दारू कारखान्यावर छापा, 17 लाख रुपयांचा माल जप्त

Drug Connection l भारती सिंग आणि पती हर्ष तुरुंगाबाहेर

Amit Shah’s ‘drug-free Punjab’ promise ahead of assembly polls

यावेळी समाजकल्याण विभाग मुंबई शहर चे सहाय्यक आयुक्त श्री. समाधान इंगळे, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुंबई विद्यापीठाचे समन्वयक डॉ. सतिष पुराणीक, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुंबई समन्वयक क्रांन्ती ओकी,  मुंबई शहरातील विविध महाविद्यालयातील ६१ तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षणाथी उपस्थित होते.

येणाऱ्या काळात मुंबई शहरात व्यसनमुक्त कार्य साठी सक्रीय होऊन सहभागी होणार असे प्रशिक्षणार्थीनी मतं मांडले तसेच या वेळी नशाबंदी मंडळाचे स्वंयसेवक भिमराव गमरे, नंदु बनसोडे यांनी व्यसनमुक्ती पर गीत गाऊन उपस्थितीकांची  मने जिंकली. या कार्यक्रमात सुत्रसंचलन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले यावेळी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी दिली.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

51 mins ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

4 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

4 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

7 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

7 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

7 hours ago