मुंबई

फडतूस फडणवीस !

फडतूस फडणवीस हे जबरदस्त आक्रमक कॅम्पेन महाराष्ट्रात आता सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणारे फडणवीस हे फडतूसच आहेत, अशी यामागील भूमिका आहे. यातून उपमुख्यमंत्र्यांना जबरदस्त आक्रमक उत्तर देण्यात आले आहे. फडतूस विषय छेडणारे शिवसेना कार्यप्रमुख आणि त्यांचा मूळ शिवसेना पक्ष राहिला राहिला  बाजूलाच, भलत्याच पक्षाने हे आक्रमक कॅम्पेन सुरू केले आहे.

शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाण्यात फडतूस म्हटल्यापासून महाराष्ट्राचे राजकारण गेले तीन दिवस फडतूस विषयाभोवतीच फिरत आहेत. आधीच कोर्टाने नपुसंक शेरा मारल्याने शिंदे-फडणवीस सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्या होत्या. मात्र, कोर्टाविरोधात थेट बोलण्याची सोय नसल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेऊन फडणवीस अँड कंपनीला गप्प बसावे लागले होते. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फडतूस गृहमंत्री म्हटल्यानंतर कोर्टाच्या नपुसंक टिप्पणीनंतर मनात धुमसत असलेल्या फडणवीस यांच्या संतांपाचा स्फोट झाला. आपण फडतूस नाही तर काडतूस आहोत असे प्रत्युत्तर फडणीस यांनी दिले. “झुकेगा नही, घुसेगा साला,” अशी फिल्मी डायलॉगबाजीही फडणीसांनी केली. त्यावरही सोशल मीडियात त्यांची टर उडविली गेली. सरकारी बंगल्यात एक मुलगी घुस गयी आणि दोन वर्षे तिचे तिथे बिनदिक्कत येणे-जाणे होते. घुसनेवाला घुसेगा, तेव्हा फडणवीस काय करत होते, असे सवाल उपस्थित केले गेले. एक युट्यूबर सरकारी बंगल्यात घुस गया साला, अशीही खिल्ली उडविली गेली.

 

खिल्ली उडविणाऱ्या फेसबुक पोस्टवरून ठाण्यातील शिवसेनेच्या रोशनी शिंदे या कार्यकर्तीला शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. उद्धव यांनी ठाण्यात रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरेंनी फडतूस काडतूस झाडले होते. ठाकरेंची ही बुलेट फडणवीसांना चांगलीच घायाळ करून गेली. आपल्याला एक फडतूस गृहमंत्री लाभलेला आहे. आशा फडतूस गृहमंत्र्यांला पदावर बसण्याचा अधिकार नाही, त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. फडणवीस यांच्या अंगी थोडीशीही हिंमत असेल तर निष्क्रीय आणि कर्तव्य विसरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून दाखवावे, असे खुले आव्हानही ठाकरेंनी दिले होते. उपमुख्यमंत्री म्हणून मिरवायचे आणि चमकायचे एव्हढेच काम फडणवीस करत आहेत. स्वतःच्या घरात काही झाले की नेमा एसआयटी, अशा या फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही, आशा शब्दात ठाकरेंनी फडणवीस यांना डिवचले होते.

ठाण्यात शिंदेसेनेने ज्यांना मारहाण केली त्या शिवसेना कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्या फेसबुकवरील शिंदे सेनेला झोंबलेली ही सावरकर गौरव यात्रा जनतेच्या प्रतिसादाविना पार पडल्याची बातमी

हे सुद्धा वाचा : 

रोशनी शिंदे मारहाणप्रकरण दिल्ली दरबारात; ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, शिंदे गटाच्या भावना गवळी यांनी घेतली अमित शहांची भेट

भक्तांची चॉईस किती फडतूस; सुषमा अंधारे यांची पोस्ट चर्चेत

कुठे राज ठाकरेंचे विचार आणि कुठे हा फडतूस कार्यकर्ता…

या फडतूस प्रकरणात आता हा विषय छेडणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेना बाजूलाच राहिली आहे, कॉंग्रेसने त्यात उडी घेतली आहे. महाराष्ट्र कॉँग्रेसने “फडतूस फडणवीस” अशी एक आक्रमक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट अशी –

  1. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणारे ‘फडतूस’ फडणवीस
    राज्यपाल कोश्यारींनी महाराजांचा अपमान केला निषेधही केला नाही
  2. ‘महाराजांनी पाच वेळा मुघलांची माफी मागितली’ असं विधान भाजप सावर प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीने केलं नागपूरात एकाच मंचावर बसले
  3. महाराजांची छत्रपती होण्याची योग्यता नव्हती म्हणणारे सावरकर गौरव यात्रा काढली

कॉँग्रेसने आता जणू तुमचे सावरकर तर आमचे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज असे रणशिंगच फुंकले आहे. सावरकरांच्या विषयावरून कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कोंडी करण्याचा भाजपने प्रयत्न केला. आता शिवाजी महाराज विरुद्ध सावरकर यांच्यात एकाची निवड करा, सावरकरांनी शिवरायांविषयी केलेल्या बदनामीकारक लिखाणावर भूमिका स्पष्ट करा, असे स्पष्ट इरादे घेऊन कॉँग्रेस आक्रमकपणे मैदानात उतरली आहे. 

Fadtus Fadanvis, Shivaji Maharaj versus Savarkar, Shivaji Maharaj DisRespect, Agreesive Campaign Against BJP, Maharashtra Pradesh Congress

 

विक्रांत पाटील

Recent Posts

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

3 mins ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

17 mins ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

31 mins ago

मिल्ट्री कॅम्प च्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

1 hour ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

2 hours ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

2 hours ago