मुंबई

Mumbai : औषध लावण्याच्या बहाण्यानं ‘तो’ तरुणीच्या गुप्तांगाला स्पर्श करायचा, अखेर…

टिम लय भारी

मुंबई : सर्जरीसाठी आलेल्या 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका वॉर्डबॉयला मुंबई (Mumbai ) पोलिसांनी अटक केली आहे. मालाड पूर्वमधील एका खासगी रुग्णायतील हा प्रकार आहे. अटक झालेल्या वॉर्डबॉयचं नाव मुकेश प्रजापती आहे. सदर आोरपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. गेल्या एका वर्षापासून तो या रुग्णालयात काम करत आहे.

नेमकं प्रकरण काय ?

सदर 24 वर्षीय तरुणी मूळव्याधीवरील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी वॉर्डबॉय त्या मुलीच्या रूममध्ये गेला आणि औषध लावण्याच्या बहाण्यानं त्यानं तिचा विनयभंग केला.

दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजापतीनं तरुणीला ऑपरेशनआधी औषध लावायचं आहे असं खोटं सांगितलं. यावेळी औषध लावण्याच्या बहाण्यानं त्यानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला.

जेव्हा तरुणीचं ऑपेरशन झालं तेव्हा तिनं आणि कुटुंबीयांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केली. यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली.

अभिषेक सावंत

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

11 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

13 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

14 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

14 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

15 hours ago