मुंबई

Jio Phone Next : रिलायन्स डिजिटलवर सेल सुरू; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

टीम लय भारी

नवी दिल्ली : रिलायन्सनं सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन बाजारात आणला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनबाबत उत्सुकता कायम आहे. त्यामुळे फोन खरेदी करण्यासाठी ग्राहक आग्रही आहेत. मात्र फोन खरेदी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. आता जिओफोन नेक्स्ट रिलायन्स डिजिटल वेबसाईटवर ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फोन ऑर्डर करता येणार आहे(Jio Phone Next: Reliance Digital launches sale).

जिओ फोन नेक्स्ट ऑनलाइन स्टोअरवर आहे त्या किंमतीच उपलब्ध आहे. मात्र बँक ऑफरचा लाभ घेऊन सवलत मिळवता येणार आहे. त्याचबरोबर शिपिंग विनामुल्य असल्याने ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

मुकेश अंबानी आणणार जगातील सर्वात स्वस्त फोन

एअरटेलचा ग्राहकांना झटका; प्रिपेड प्लॅनचे दर वाढवले

जिओफोन नेक्स्टमध्ये इतर स्मार्टफोनसारखी सर्व वैशिष्ट्ये आहेत. मात्र जिओने टूजी ग्राहकांना ४जी कडे आकर्षित करण्यासाठी डिव्हाइसची किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जिओफोन नेक्स्टचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची एंट्री लेव्हल किंमत आहे. जिओफोन नेक्स्टची किंमत ६४९९ रुपये आहे. ही किंमत २जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मॉडेलची आहे.

अधिकृत रिलायन्स डिजिटलवर बँकांच्या सवलती दिल्या आहेत. येस बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना १० टक्क्यांपर्यंत सवलत आणि अमेरिकन एक्स्प्रेस कार्डवर ७.५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. दुसरीकडे, हप्त्यावर फोन घ्यायचा ठरल्यास ३०५.९३ रुपये प्रति महिना भरून क्रेडिट कार्डने फोन खरेदी करू शकता. या फोनला एका वर्षाची वॉरंटी दिली आहे.

जिओ फोन स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर जिओफोन नेक्स्ट प्रगती ओएसवर काम करतो. यात ५.४५ इंचाचा एचडी (७२०x१,४४० पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ संरक्षण आणि अँटी-फिंगरप्रिंट कोटिंग आहे. याशिवाय, हा फोन १.३ GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१५ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यामध्ये २ जीबी आणि ३३ जीबी स्टोरेज आहे. स्टोरेज ५१२ जीबीपर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील कॅमेरा वैशिष्ट्यांमध्ये पोर्ट्रेट मोड, नाईट मोड आणि प्रीलोडेड कस्टम इंडिया-ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरचा समावेश आहे. फोनमध्ये ३,५०० mAh बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये मायक्रो-यूएसबी पोर्ट, ३.५ मिमी ऑडिओ जॅक, ब्लूटूथ व्ही ४.१, वाय-फाय आणि ड्युअल-सिम (नॅनो) स्लॉट आहे. सेन्सरमध्ये एक्सीलरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश होतो. जिओफोन नेक्स्ट स्वयंचलित सॉफ्टवेअर अपग्रेडसह येतो.

Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, 64MP बॅक, 50MP फ्रंट कॅमेरासह जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

JioPhone Next on sale via Reliance Digital’s website: Price, offers, specifications

जिओफोन नेक्स्टसाठी चार पर्याय  

जिओ फोन १९९९ रुपयांना बुक केल्यानंतर पुढील प्रमाणे ईएमआय भरावे लागतील.

  • जिओफोन नेक्स्टसाठी पहिला प्लान ऑलवेज ऑन प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकाला १८ महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याचे ३५० आणि २४ महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याचे ३०० रुपये द्यावे लागतील. ग्राहकांना दर महिन्याला ५ जीबी डेटा आणि १०० मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळेल.
  • लार्ज प्लानमध्ये १८ महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला ५०० रुपये किंवा २४ महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला ४५० रुपये मोजावे लागतील. यात दिवसाला १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दिवसाला १०० एसएमएस मिळतील.
  • तिसरा एक्सएल प्लान आहे यात दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंग असणार आहे. यासाठी ग्राहकाला १८ महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला ५५० रुपये आणि २४ महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला ५०० रुपये भरावे लागतील.
  • चौथ्या एक्सएक्सएल प्लानसाठी ग्राहकांना २४ महिन्यांसाठी ५५० रुपये दरमहा भरावे लागतील. तर १८ महिन्यांसाठी दरमहा ६०० रुपये भरावे लागतील. यात २.५ जीबी डेटा दिवसाला आणि अनलिमिटेड व्हॉइस आणि १०० एसएमएस दिवसाला मिळतील.

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

6 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

6 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

7 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

7 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

7 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

11 hours ago