मुंबई

मुंबईतही चालते सावकारी, गिरगावातील सावकराच्या घरी टाकली धाड

टीम लय भारी

मुंबई:- सावकारी करणारे गरजवंतांना मोठ्या प्रमाणात कर्जावर रक्कम देऊन, आर्थिक मदतीच्या नावावर मोठ्या प्रमाणात शोषण करतात. दक्षिण मुंबईतील मोरवी क्रॉस लेन स्थित मलबार व्हयु २ इमारतीमध्ये एक व्यक्ती बेकायदा सावकारी व्यवसाय करत होता. या बेकायदा सावकारी व्यवसाय करणाऱ्या महावीर चंपकलाल शाह यांच्या राहत्या घरी उपनिबंधक सहकारी संस्था डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यामध्ये मोठया प्रमाणावर अवैध सावकारी संबंधित कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत (lender in Mumbai, raid on lender house in Girgav).

बेकायदा सावकारी व्यवसाय करणाऱ्या शहा विरोधात उपनिबंधक, सहकारी संस्था, डी विभाग, मुंबई कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी करून डॉ. अविनाश ए. भागवत, उपनिबंधक सहकारी संस्था डी विभाग यांच्या नेतृत्वाखाली सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार (ता.27) बेकायदा सावकारी व्यवसाय करणाऱ्या शाह यांच्या राहत्या घरी धाड टाकली. यांच्या घराची झडती घेण्यात आली, त्यावेळी मोठया प्रमाणावर अवैध सावकारी व्यवहाराच्या अनुषंगाने कोरे धनादेश, विमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र अशी सर्व अवैध सावकारी संबंधित सर्व कागदपत्रे सहकार विभागाच्या हाती लागली आहेत, तसेच ती कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालु असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले (lender against investigation is underway Bhagwat has said).

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू क्वार्टर फायनलमध्ये धडकणार

बैल मुततो तशा मी भूमिका मी बदलत नाही: राज ठाकरे

सहकार विभाग अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये उपनिबंधक, प्रशांत सातपुते, संजय गाडे पाटील, अजय भालके, राखी गावडे व कर्मचारी अनिल शिंदे, जितेंद्र चव्हाण, संदीप खोत, निखील खोचरे इत्यादी अधिकारी होते.

सावकारी व्यवसाय

सावकार महावीर चंपकलाल शाह यांच्या विरोधात ही कारवाई विभागीय सहनिबंधक, मुंबई विभाग, मुंबई, बाजीराव शिंदे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर, जे.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन मुंबई विभागात अवैध सावकारी व्यवसायिकाबद्दल काही तक्रार असल्यास त्या विषयी सहकार विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी केले आहे.

अमोल कोल्हे म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व केले, तर अभिमान असेल, पण….

Mumbai: NCB arrests two drug peddlers in separate raids, seizes MD drugs

नवा सावकारी कायद्यात या आहेत शिक्षा

2014च्या नव्या सावकारी कायद्यानुसार विनापरवाना व अवैध सावकारी केल्यास संबंधितांस 5 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना प्राप्त करून घेताना हेतूपुरस्सर व जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती अर्जासोबत सादर केल्यास, 2 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 25 हजापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे (Lender Act, those who commit unlicensed and illegal lending are punished).

Sagar Gaikwad

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago