32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयअमोल कोल्हे म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व केले, तर अभिमान असेल, पण....

अमोल कोल्हे म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व केले, तर अभिमान असेल, पण….

टीम लय भारी

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या होत्या. यावर राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. मला अभिमान असेल पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे माहिती नाही पण ती महत्त्वाची असेल, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत (Amol Kolhe says, if Uddhav Thackeray led the nation, there would be pride but ….).

संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल आशावादी असायला काहीच हरकत नाही. कोणती ही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला आहे, असेही अमोल कोल्हे म्हणाले.

संजय राऊत यांचा पुन्हा एकदा ‘या’ प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त काही अपेक्षा…

संजय राऊत यांनी जो आशावाद व्यक्त केला आहे त्या बद्दल त्यांना शुभेच्छा मात्र पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे माहिती नाही पण ती महत्त्वाची असेल, असे अमोल कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe say Uddhav Thackeray led nation pride but
अमोल कोल्हे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सरकारला चाप बसणं गरजेचं

देशाच्या दृष्टीने आता विरोधकांचा चेहरा कोण हा मुद्दा गौण ठरतो आहे आणि सरकारच्या या एक कलमी कार्यक्रमाला चाप बसवणे गरजेचे आहे. अशा काळात विरोधी पक्षाने एकत्र येणे हे आशादायी चित्र आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत (Amol Kolhe said it was a hopeful picture for the Opposition to come together at such a time).

महाविकास आघाडीसह 14 पक्षांची दिल्लीत बैठक; ‘या’ प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरणार

Maharashtra CM Uddhav Thackeray to chair meeting with COVID Task Force today, decision on easing curbs likely

 

सरकारने चर्चेपासून पळ काढू नये

सरकार संसदेत चर्चेतून पळ काढताना दिसत आहे. संसदेची कार्यवाही चालवणं हे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. कामकाज सुरू होण्याची नितांत आवश्यकता आहे. पण ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. चर्चेला जर सत्ताधारी तयार झाले तर अनेक प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होईल. सरकार जर चर्चेतून पळ काढत असेल तर जनतेचे प्रश्न मांडताना अडचणी येतील, असे अमोल कोल्हे म्हणाले (Amol Kolhe said the government seems to be running away from the debate in Parliament).

पेगसेस, कोविडची तिसरी लाट, प्रचंड वाढलेली महागाई, कृषी कायदे या विषयांवर संसदेत चर्चा झालीच पाहिजे. सरकार म्हणत असेल की हाऊसमध्ये काम रेटून नेऊ पण आमचा याला जोरदार विरोध असेल, असा पवित्राही अमोल कोल्हे यांनी घेतला आहे (Amol Kolhe said, “Let’s retune the work in the House but we will strongly oppose it).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी