मुंबई

Mission begins again start : ठाकरे सरकारचे मिशन बिगिन अगेन सुरु

  • दुकाने उघडण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी
  • मुंबईतून ठाणे, कल्याण, बदलापूरला जायला निर्बंध नाहीत
  • आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी मात्र पासची गरज

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रातील अनलॉक- 1च्या (Unlock 1.0) नियमावलीत बदल करण्यात आले असून आता मिशन बिगिन अगेनच्या (Mission begins again start) पहिल्या टप्प्यात बदललेली नियमावली सरकारने जारी (New regulations announced by govt) केली आहे. या नव्या नियमावलीत मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये (MMR) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने एकाच दिवशी उघडण्यास परवानगी नाही. ऑड आणि इव्हन या नियमाप्रमाणे रस्त्याच्या एका बाजूची आणि दुस-या बाजूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे आता ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील महापालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने पाचव्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याअंतर्गत वाहतूक बंदी केली होती. यामुळे मुंबई महानगरीय क्षेत्रातही कामानिमित्त प्रवास करणे शक्य नव्हते. यामुळे राज्य सरकारने कायद्यात बदल केला आहे आणि एमएमआरडीए क्षेत्रात वाहतूक परवानगी दिली आहे.

खासगी ऑफिसमध्ये दहा टक्के कर्मचारी असतील. इतर कर्मचारी घरून काम करतील. ऑफिसमध्ये येणा-या कर्मचा-यांना कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आता घरोघरी वृत्तपत्र वितरण करता येणार आहे, मात्र वृत्तपत्र दारोदारी पोहोचवणा-याने मास्क घालणे बंधनकारक आहे, सोशल डिस्टन्सिंग नियमांचेही पालन करावे, असे या नियमावलीत म्हटले आहे. यासोबतच केंद्र सरकारने जाहीर केलेली नियमावलीही लागू असणार आहे.

मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यासाठी आता कोणतेही निर्बंध नसतील. तसेच बीच, सरकारी-खासगी मैदाने, सोसायट्यांचे मैदान, गार्डन अशा ठिकाणी आता आरोग्याच्या दृष्टीने व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी असेल. पण हे केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ७ याच काळात करता येईल, असेही सांगण्यात आले होते. यासंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील दुकाने ऑड इव्हन तत्त्वावर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी तर दुस-या बाजूची दुकाने दुस-या दिवशी खुली ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. तसेच याची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी पालिकांचे आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांचादेखील या प्रक्रियेत सहभाग असणार आहे. तसेच ते मार्केट आणि दुकान मालकांच्या असोसिएशनच्यादेखील संपर्कात राहणार आहे. दुकानांमध्ये खरेदीला जाताना सोशल डिस्टन्स आणि अन्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालनही करावे लागणार आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

10 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

11 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

11 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago