महाराष्ट्र

Murder in Police Station : पोलीस ठाण्यातच हल्ला; कोयत्याने उभा चिरला

टीम लय भारी

सातारा : प्रेयसीच्या वादातून आज (गुरूवारी) तालुका पोलिस ठाण्यातच भरदिवसा एकाला कोयत्याने उभा चिरल्याची (Murder in Police Station) थरारक घटना घडली. हल्ला करण्यासाठी आलेल्याच्या कोयत्यानेच त्याने डोक्‍यात व हातावर गंभीर वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिस ठाण्यामध्येच खून होण्याची ही जिल्ह्यातील पहिली घटना आहे.

सुरेश प्रल्हाद कांबळे (वय 44, रा. सैदापूर) असे मृताचे नाव आहे. तर, रामा दुबळे (रा. मतकर कॉलनी) असे त्याला मारणाराचे नाव आहे. या मारामारीत रामा दुबळेही जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामा दुबळे याची सासुरवाडी सैदापूरमध्ये आहे. त्याच वस्तीत सुरेश कांबळे हा त्याच्या कुटुंबासह राहत होते. रामा दुबळे याची पहिली दोन लग्न झाली आहेत. आता त्याचे दुस-या एका मुलीबरोबर फिरणे चालू होते. त्या मुलीचा सुरेश कांबळे याच्या मुलीशी वाद झाला होता. त्याबाबत त्या मुलीने रामाला माहिती दिली. त्यानंतर रामाने सुरेश कांबळेच्या मुलीला शिवीगाळ व मारहण केली. तीन दिवसापूर्वी याबाबत सुरेशच्या मुलीने तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

दाखल तक्रारीमध्ये आज दोघांनाही तालुका पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. सुरेश कांबळे हा आधीच तालुका पोलिस ठाण्यात आला होता. त्याने सोबत कोयता आणला असल्याची कोणाला माहिती नव्हती. थोड्या वेळाने रामा दुबळेही पोलिस ठाण्यात आला. तो पोलिस ठाण्यात आल्या-आल्यानंतर सुरेश कांबळेने तत्काळ रामा दुबळेवर पोलिसांसमोरच कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. हल्ला करत-करत दोघे पोलिस ठाण्याच्या बाहेर आले. या वेळी सुरेश कांबळेच्या हातातून कोयता निसटून खाली पडला. तीच संधी साधत रामा दुबळेने तो कोयता उचलला आणि सुरेश कांबळेच्या डोक्‍यात, हातावर सपासप वार करायला सुरवात केली. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात रक्ताचा सडाच पडला होता.

सोडावायला मध्ये पडायलाही कोणी धजावणार नाही अशी परिस्थिती होती. त्यातूनही काहींनी पुढे सरसावून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. गंभीर हल्ला व रक्तस्त्रावामुळे सुरेश कांबळे खाली कोसळला. तसेच रामाच्या शरीरातूनही रक्त वहात होते. पोलिसांनी दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, सुरेश कांबळेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. रामा दुबळेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलिस ठाण्यात झालेल्या या थरारक प्रकारामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त अधिक्षक धिरज पाटील यांनी तातडी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी अधिका-यांना तपासाबाबतच सुचनाही दिल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया तालुका पोलिस ठाण्यात सुरू होती.

अभिषेक सावंत

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

6 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

6 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

7 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

7 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

7 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

11 hours ago