मुंबई

Mumbai Local : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फे-यांमध्ये वाढ

टीम लय भारी

मुंबई : सर्वांसाठी लोकल प्रवासाचा तिढा कायम असताना मुंबई लोकलच्या (Mumbai Local) फे-यांमध्ये आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने याबाबत आज एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील विशेष लोकलच्या एकूण फे-यांच्या संख्येत आजपासून २०२० फे-या सुरु केल्यानंतर, उद्यापासून त्यात ७५३ फे-यांची वाढ करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकलसेवा बंद आहे. सर्वसामान्यांनासाठी लोकल सेवा खुली करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेला प्रस्ताव दिला आहे. मात्र, तो प्रस्ताव अनेक अद्याप मंजूर करण्यात आलेला नाहीये. त्यामुळं सर्वसामान्यांनासाठी लोकलचे दार कधी उघडणार याची प्रतीक्षा असतानाच लोकल प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.

रेल्वे प्रशासनाने करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व सोशल डिस्टनसिंग हे सर्व मुद्दे लक्षात घेत लोकलच्या फे-यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आजपासून २०२० फे-या सुरू केल्यानंतर, उद्यापासून त्यात ७५३ फे-यांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी एकूण २७७३ फे-या चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ५५२ तर पश्चिम रेल्वेवर २०१ फे-यांची वाढ करण्यात आली. या लोकल फे-यांमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना आणि महिला प्रवाशांना प्रवासाची मुभा असणार आहे.

सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत राज्य सरकारने सुचवलेल्या प्रस्तावावर मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपला लेखी अभिप्राय दिला आहे. त्यावर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या विनंतीनुसार लोकल फे-या टप्याटप्याने वाढवण्यात येत आहेत, असे रेल्वे अधिका-यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

 

मुंबई उपनगरीय लोकलबाबत अनेक अफवा वेळोवेळी पसरवल्या जात असतात. ती बाब ध्यानात घेऊन कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जे वैद्यकीय व सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत त्याचे प्रवाशांनी काटेकोरपणे पालन करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

13 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

15 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

15 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

16 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

16 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

17 hours ago