मुंबई

मुंबई लोकलवर पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता? : विजय वडेट्टीवार

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात दिवसेंदिस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल अर्थात बुधवारी तब्बल ६० हजारांच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले. मुंबईत तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकट्या मुंबईत रोज १०  हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबई तसे उपनगरीय प्रवास सोपा आणि सोयिस्कर करणाऱ्या लोकलवर पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. तसा विचार राज्य सरकार करत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

कोरोना वाढतोय, लोकलवर लवकरच निर्णय

“राज्यात तसेच मुंबईत कोरोना संसर्ग वाढत आहे. सामान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून मागच्या वर्षी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सध्या लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकल पूर्ण बंद करावी किंवा मागच्या वेळेस लोकल सेवेला जे निर्बंध होते ते घालावेत; यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. त्यावर लवकरच विचार केला जाईल,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५ दिवसांवर 

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे येथे रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. येथे काल एका दिवसात तब्बल १०,४२८ नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर काल दिवसभरात येथे ६००७ जणांनी डिस्चार्ज देण्यात आला. कालच्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या ८०८८६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. आज पुन्हा या रुग्णांमध्ये भर पडली असेल. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८० टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३५ दिवसांवर आला आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवारा यांनी लोकल बंद किंवा नवे निर्बंध लागू करण्याबद्दल वरील सूचक वक्तव्य केल्यामुळे आता चाकरमाण्यांच्या प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. तसेच लोकलवर नव्याने निर्बंध लागू केले तर ते कोणते असतील याबद्दलसुद्धा अनेक तर्क लावले जात आहेत.

Rasika Jadhav

Recent Posts

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

37 mins ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

3 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

4 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

4 hours ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

5 hours ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

6 hours ago