मुंबई

मुंबई लोकल बंद होणार नाही पण…

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईत सुध्दा पुन्हा कोरोना डोकेवर काढले आहे. मुंबईत देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढीचा आकडा दिवसाला ४० हजारांवर गेला आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आणखी काय उपाययोजना करायच्या या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली.

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असला तरी लॉकडाऊनला विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही विरोध आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय मागे पडला आहे. परंतु, निर्बंध अधिकाधिक कठोर करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहेत. गर्दी होणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुंबई लोकलबाबत सरकार काय निर्णय घेणार? लोकल पुन्हा बंद होणार का? याविषयी मुंबईकरांच्या मनात धाकधूक आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आज याबाबत माहिती दिली. ‘मुंबईतील लोकल पूर्णपणे बंद होणार नाही. पण, लोकल प्रवासावर काही निर्बंध लादले जातील. लोकल प्रवासाचे नियोजन वेगळ्या पद्धतीने केले जाईल. गर्दी नियंत्रणात ठेवतानाच लोकांची गैरसोय होणार नाही हे पाहिले जाईल. मागील वेळी पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले होते, असे ही ते म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

‘कोरोनाची आताची स्थिती भयंकर आहे. करोनाबाधितांमध्ये यावेळी २५ वर्षे वयाच्या आतील रुग्णांची संख्या जास्त आहे. लहान मुलांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. सरकारकडून उपाययोजना सुरूच आहेत,’ असे ही वडेट्टीवार म्हणाले.

Rasika Jadhav

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

18 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago