Categories: मुंबई

आता भिकारीही होणार स्वावलंबी; मिळणार कौशल्य विकासाचे धडे

मुंबई असो वा देशातील कोणत्याशी शहरात भिकारी आपल्याला हमखास दिसतात. दिवसभर भीक मागून ते रात्री फुटपाथ वा मिळेल तो आडोसा शोधत तिथे राहतात. सार्वजनिक प्रसाधन गृहाचा वापर ते करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ट्रिलियन (पाच लाख कोटी) डॉलरच्या अर्थ व्यवस्थेचे ध्येय गाठण्याचे ठरवले असताना भारतात भिकाऱ्यांची समस्या गंभीर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई त्यातून सुटलेली नाही. भिकारी निर्मूलन व्हावे यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या. पण त्या कागदावरच पूर्ण झाल्या आहेत. काही स्वयंसेवी संस्थाही भिकाऱ्यांसाठी काम करत असतात. असे असताना आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भिकाऱ्यांना स्वावलंबी करण्याचे ठरवले आहे. यासाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश तटकरे यांनी प्रशासनाला दिले.

चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना आदिती तटकरे यांनी अलीकडेच भेट देऊन तिथे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, अन्न-धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी असणारी स्वच्छता तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत पाहणी केली. तिथे तयार करण्यात आलेल्या जेवणाची चवही चाखून तिची गुणवत्ता त्यांनी तपासली.

भिक्षेकरी (भिकारी) प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जाव्यात, भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कमी कालावधीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची त्यांनी पाहणी केली.
हे सुद्धा वाचा
पुढच्या महिन्यात राज्यातील ‘मुख्य’ खुर्ची बदलणार; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा दावा
दिवाळी नंतर आता गौरी-गणपतीला मिळणार आनंदाचा शिधा, राज्य सरकारचा निर्णय
पक्ष फोडाफोडीनंतर भाजपा लागली ‘वॉर रूम’च्या पाठी, भाजपचा नवा ‘मेगा प्लॅन’ तयार

भिक्षेकरी प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जाव्यात, भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कमी कालावधीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची त्यांनी पाहणी केली. तेथील बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण याबाबत यावेळी त्यांनी माहिती घेतली. बालके आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त तथा दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीचे मुख्याधिकारी बापूराव भवाणे, मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच.नागरगोजे, मुंबई शहर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी शोभा शेलार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विवेक कांबळे

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago