मंत्री राजेश टोपे यांचा निर्धार : गाव खेड्यातही सहज उपलब्ध होणार वैद्यकीय सेवा

टीम लय भारी

मुंबई : आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत. मार्च अखेर एकूण सुमारे ६५०० आरोग्यवर्धिनी केंद्र राज्यात कार्यान्वित होतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद व नंदुरबार हे राज्यातील चार आकांक्षित जिल्हे तसेच भंडारा, चंद्रपूर, वर्धा, सातारा, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, अहमदनगर, नांदेड, हिंगोली, गोंदिया,अमरावती, सिंधुदूर्ग, जळगांव असे १९ जिल्हयातील एकूण ११६९ आरोग्य उपकेंद्रांचे व सर्व जिल्ह्यातील १५०१ (ग्रामीण भागातील) व ४१३ (शहरी भागातील) प्राथमिक आरोग्य केंद्र असे एकूण 3083 आरोग्यकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जालना, बीड, परभणी या सारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह उर्वरित जिल्ह्यात ही केंद्रे सुरू होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

जाहिरात

प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा प्रयत्न- आरोग्यमंत्री

सदर केंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर आयुर्वेद, युनानी, नर्सिग पदवीधारक नियुक्त केले जाणार आहेत. आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये व त्याअंतर्गत येणा-या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा शासनाचा मानस असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

निवड झालेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येते. २०१९-२० मध्ये पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३६९६ (आयुर्वेदीक २३८८, युनानी २३३ व बी.एस्सी नर्सिंग १०७५) समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण ऑगस्ट २०१९ पासून सुरु करण्यात आले आहे. प्रशिक्षित समुदाय आरोग्य अधिकारी हे निकास परीक्षा उत्तीर्ण होऊन फेब्रुवारी २०२० पासून आरोग्य उपकेंद्रांवर कार्यरत होतील. त्यामुळे मार्च पासून अजून 3500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होतील असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आधुनिक जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य रोगांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या दिल्या जाणाऱ्या माता बालसंगोपन आरोग्य सेवांमध्ये वाढ करुन असंसर्गजन्य आजार तपासणीसाठी आरोग्य सेवा आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून पुरविण्याचे उद्दीष्ट आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये खालील १३ प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जाणार आहेत

१. प्रसुतिपूर्व व प्रसुती सेवा
२. नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणा-या सेवा
३. बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा
४. कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व आवश्यक आरोग्य सेवा
५. संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रोगांधी बाह्य रुग्ण सेवा
६. संसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी
७. असंसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी
८. मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी
९. नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजार संबंधी सेवा
१०.दंत व मुखरोग आरोग्य सेवा
११.वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार
१२. प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा
१३.आयुष व योग

हे सुद्धा वाचा

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

…अन् शरद पवारांना पोलिसांनी पाठीवर वळ उठेपर्यंत मारले

मुख्यमंत्र्यांनी तहसिलदारांना खूर्चीत बसविले, अन् त्यांच्यासोबत फोटो काढला; तहसिलदार म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण

वाडियाचा वाद सोडविण्यात अजितदादा, राजेश टोपे यांचेही योगदान

VIDEO : तळागाळातील रूग्णांसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा धडाकेबाज निर्णय

 

तुषार खरात

Recent Posts

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

4 mins ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

57 mins ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

2 hours ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

3 hours ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

4 hours ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

5 hours ago