मुंबई

Reserve Bank : रिझर्व्ह बँकेचा निर्णय ! कोल्हापूरच्या सुभद्रा एरिया लोकल बँकेचा परवाना रद्द

टिम लय भारी

मुंबई : येथील सुभद्रा लोकल एरिया बँकेने २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील दोन तिमाहीममध्ये किमान नेटवर्थच्या मर्यादेचं उल्लंघन केलं. तसंच, बँकेकडे ठेवीदारांचे पैसे परत करण्याएवढीही रक्कम शिल्लक नसल्यानं या बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) म्हटलं आहे. ज्या पद्धतीने बँकेचं काम सुरू होतं, त्यानुसार सध्याच्या घडीला आणि भविष्यात ग्राहकांचं मोठं नुकसान झालं असतं, असा ठपकाही बँकेने यावेळी ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईमुळे बँकेत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवान रद्द केला आहे. सलग दोन तिमाहींमध्ये किमान नेटवर्थची मर्यादा पाळू न शकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसंच बँकेच्या कार्य पद्धतीवर बोट ठेवून हा परवाना रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेचं लायसन्स रद्द केलं होतं. (RBI cancels licence of Subhadra Local Area Bank, Kohlapur)

दरम्यान, या बँकेची १९९६ साली स्थापना झाली होती. उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसह नागरिकांच्या विकासाच्या हेतूने स्थापन झालेली ही बँक लवकरच लोकप्रियही झाली होती. स्थानिक लोकांना बँकिंगची, बचतीची सवय लागावी, त्यांच्या कर्जाच्या छोट्या छोट्या गरज लगोलग भागाव्यात अशा हेतूने लोकल एरिया बँकांचा जन्म झाला. थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली कारभार चाणारी ही राज्यातील पहिलीच स्थानिक बँक होती. तर देशातील ही चौथी बँक होती. या बँकेची केवळ कोल्हापूरमध्येच शाखा नाही तर कर्नाटकपर्यंत बँकेचं जाळं पसरलेलं आहे. कोल्हापूरसह सातारा, सांगली, बेळगाव आणि पुण्यातही बँकेच्या शाखा आहेत. सुभद्रा बँकेच्या कोल्हापुरात सुरुवातीला तीन शाखा कार्यरत होत्या. मात्र गेल्या काही दिवसापासून एक शाखाच कार्यरत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानंतर आता राज्यातील आणखी एका बँकेला रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाळं लावण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यातील नावाजलेली ‘कराड जनता बँक’ दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडीने या बँकेचा परवाना रद्द केला होता. कराड जनता बँक ही सातारा जिल्ह्यात एक नावाजलेली बँक आहे. सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या बँकेचे हजारो ठेवीदार आहेत. या बँकेवर २०१७ साली रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरित गेल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ही अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली होती. (RBI cancels licence of Subhadra Local Area Bank, Kohlapur)

रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध

– देवाण-घेवाण नाही

सुभद्रा लोकल एरिया बँकेचं कामकाज २४ डिसेंबर रोजी संपल्यानंतर त्या क्षणापासून त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेला कोणतीही देवाण-घेवाण करता येणार नाही, असं रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटलं आहे.

– उच्च न्यायालयात माहिती देणार

रिझर्व्ह बँक सुभद्रा लोकल एरिया बँकेच्या एकूण कामकाजाचा लेखाजोखा उच्च न्यायालयात सादर करणार आहे. त्यामुळे बँकेची सध्याची पत आणि आर्थिक डबघाई अधिक स्पष्ट होणार आहे.

– या नियमांतर्गत कारवाई

रिझर्व्ह बँकेने सुभद्रा एरिया लोकल बँकेवर बँक रेग्युलेटिंग अॅक्ट १९४९च्या सेक्शन २२ (४) अंतर्गत ही कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढे बँक नियमन कायदा ५ (ब) नुसार बँकेला यापुढे कसलाही व्यवहार करता येणार नाही.

अभिषेक सावंत

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

3 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

3 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

3 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

4 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

6 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

6 hours ago