टॉप न्यूज

Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कमकुवत; गुणवत्ता चाचणीत माहिती उघड

टिम लय भारी

अयोध्या : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात एक विघ्न निर्माण झाले आहे. वजनाचा भार सहन करण्याच्या अपेक्षित क्षमतेच्या चाचणीमध्ये मंदिराचे बांधकाम नापास ठरल्याची माहिती, खुद्द श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकामात त्रुटी समोर आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या त्रुटी दूर करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले जात आहेत.

बाबरी मशिदीच्या वादग्रस्त प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच संबंधित जागेवर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील बांधकामाच्या गुणवत्ता चाचणीतच काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या दूर करण्याचे पर्याय शोधले जात आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील सर्वोत्तम संस्था असलेल्या आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था (सीबीआरआय) यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिराच्या रचनेवर काम सुरु आहे. तर ‘एल अँड टी’, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स यासारख्या नामवंत कंपन्यांचे इंजिनिअर्स यावर काम करत आहेत.

राम मंदिराच्या प्रस्तावित जागेच्या गर्भगृहाच्या पश्चिमेकडे पाणी वाहू लागल्याने जमिनीची प्रत खालावली असून सैल वाळूसारखी जमीन झाल्याचे संकट इंजिनिअर्ससमोर उभे राहिले आहे. मंदीराच्या पायाच्या बांधकामाचे डिझाइन ‘एल अँड टी’ने याआधीच सादर केले असून यात जमिनीत 20 ते 40 मीटर खोल आणि आणि सुमारे 1 मीटर व्यासाचे 1200 सिमेंट काँक्रीटचे पाइल्स उभारले जाणार आहेत.

याबाबत श्री राम मंदिर जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले की, निश्चित केलेल्या आराखड्यानुसार, एकूण 1200 खांब जमिनीत उभारले जाणार आहेत. यातील काही खांब जमिनीत 125 फूट खोल उभारले जाणार आहेत आणि बांधकामाच्या निषकांनुसार याची 28 दिवसांनंतर आम्ही तपासणी केली. भूकंप सदृष परिस्थिती निर्माण करण्यासोबतच खांबांवर 700 टन वजन ठेवले आहे. पण यातून आम्हाला अपेक्षित निकाल हाती लागला नाही. चाचणीत थोडाफार फरक असता तर निभावून नेता आले असते. पण खूप मोठा फरक जाणवल्याचे राय म्हणाले.

प्रकल्प व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण

केवळ खांब आणि पाइलिंग भार पेलण्यासाठी सक्षम नाही हे आमच्या लक्षात आले असून इतर पर्यायांचा विचार केला जात असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक जगदीश अफाळे यांनी सांगितले आहे. मंदीराच्या पायाच्या रचनेबाबत सर्व तंत्रज्ञांसोबत बैठक झाली असून या महिन्या अखेरपर्यंत यावर मार्ग काढला जाईल. त्यानंतर राम मंदीर ट्रस्टसमोर योजना सादर केली जाईल आणि त्यांच्या मंजुरीनंतरच पुढील कामाला सुरुवात होईल. संपूर्ण प्रकल्पाची योजना पूर्णत्वास आल्याशिवाय आम्ही कामाला सुरुवात करू शकत नाही. पुढील किमान हजार वर्षांपर्यंत बांधकाम पक्क राहील अशापद्धतीची योजना आखण्याचे काम अजूनही सुरू असल्याचे जगदीश अफाळे म्हणाले.

अभिषेक सावंत

Recent Posts

गुगलची मेहरबानी, ‘लय भारी’ची प्रगती !

‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…

1 hour ago

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

4 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

4 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

5 hours ago

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…

5 hours ago

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; त्या प्रकरणाचा निकाल आला; बायकोचं पदही गेलं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…

5 hours ago