मुंबई

निसर्गाने कूस बदलली; राज्यात दुपारी उन्हाचा चटका रात्री गारठा!

मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्य तापलेले असताना, निसर्गाने कूस बदलली आहे. राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा असर कमी होत असून पारा घसरताना दिसत आहे. अनेक भागात उन्हाची तीव्रता कमी होत असून थंडी वाढू लागली आहे. असे असले तरी काही भागात उन्हाची झळ बसत आहे. महाराष्ट्रात किनारी भागात तापमान वाढणार आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात सकाळी हवेत गारवा जाणवत आहे, पण दुपारी मात्र उन्हाचा चटका बसत आहे, तापमान 35-36 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मुंबईकरांना थंडीचा आनंद घेण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मराठा आणि धनगर आंदोलनाने राज्याचे वातावरण तापायला सुरुवात केली आहे. विशेषतः सोमवारी मराठवाड्यातील दोन आजी आमदार आणि माजी आमदार यांचे घरे पेटवून देण्यात आले. अनेक सरकारी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. एकुणात मराठा आंदोलनाने राज्यातील वातावरण पेटलेले आहे. असे असताना निसर्गही आपली कूस बदलायला लागला आहे. रात्री थंडी, पहाटे गारवा आणि दुपारी कडक उन असे वातावरण सध्या पहायला मिळत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी वाढत आहे. अनेक जिल्ह्यांत दुपारचे तापमान 33 अंशांच्या खाली गेल्याचं दिसून येत आहे. सातारा, कोल्हापूर आणि नागपूरमध्येही थंडीची चाहूल लागली आहे. अलीकडच्या काळात राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात झाली असून, पारा 11.3 अंशांवर पोहोचला आहे. तर पुणे, निफाड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 15 अंशांपेक्षा कमी राहिले. राज्यात कमाल तापमानात घट होत असल्याने गुलाबी थंडी वाढू लागली आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात हळूहळू आणखी घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावसाचीही शक्यता आहे.

राज्यातील बहुतेक भागात थंडी वाढत असून, कोकणात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पण, या तुरळक पावसाचा हवामानावर फारसा परिणाम होणार नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा 

मराठा आरक्षणाला हिंसक वळण! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची पोलिस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक…
बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर, भुजबळांच्या कार्यकर्त्याचे हॉटेल पेटवले
गरीब मराठ्यांसाठी तुमचं असणं अपरिहार्य..असे जरांगेंना का म्हणाले प्रकाश आंबेडकर

तामिळनाडू आणि केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासात कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

देशभरात तापमान कसं असेल?
आज उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, ओडिशा, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये म्हणजे मणिपूर आणि आसपासच्या परिसरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाची शक्यता आहे. यासोबतच 1 नोव्हेंबरपासून जम्मू-काश्मीर, लेह आणि लडाखच्या पश्चिम हिमालयीन भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago