33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण आंदोलन का पेटलं?

मराठा आरक्षण आंदोलन का पेटलं?

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज मंगळवार (31 ऑक्टोबर) सातवा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी अन्न पाण्याच्या केलेल्या त्यागामुळे त्यांची प्रकृती फारच खालावली आहे. मराठा आरक्षणाबाबतीत सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तर, दुसरीकडे काही ठिकाणी मात्र राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्याचे दिसत आहे. काल सोमवार (30 ऑक्टोबर) बीड जिल्ह्यात हिंसचाराच्या घटना घडून आल्या. हिंसक जमावाकडून दोन आमदारांची घरेदेखील जाळण्यात आली. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली.

अगदी शांततामे मार्गाने चाललेले मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलकांनी बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवले. तसेच, अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी बसेस जाळण्यात आल्या असून काही ठिकाणी रस्त्यांवर तयार जाळून रास्ता रोको करण्यात आला होता. यामुळे राज्य सरकार अलर्ट मोड वर आली असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांतर्फे आता ठोस अॅक्शन घेतली जाणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पोलिस आधीक्षकांसोबत एक विशेष बैठक बोलावली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत राज्यात चाललेल्या हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी, पोलिसांनी मराठा आंदोलनाच्या आडून काही समाजकंटकांकडून हिंसेला खतपाणी घातले जात असल्याचा अहवाल सादर केला. अश्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची सूचना गृह मंत्रालयाकडून देण्यात आली, तसेच, सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या अकाउंट्सवर सायबर पोलिसांतर्फे विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे.

जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक

आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. मराठा समाजाने शांत रहावं असं आवाहन करताना मनोज जरांगे म्हणाले की, “सर्वाना माझी हात जोडून विनंती, आज रात्री आणि उद्या दिवसा कुठेही जाळपोळ कानावर येऊ देऊ नका. आंदोलन शांततेत सुरू आहे, ते पूर्ण करायचं आहे. आपण कुणाच्याही दारात जाचचं नाही.”

जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक असल्याचा आरोप करत मनोज जरांगे म्हणाले की, काही सत्ताधारी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपलीच घरं जाळण्याचा प्रयत्न करतात अशी शंका आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही धिंगाणा घातला तरी आपण उपोषण थांबवणार नाही.

हे ही वाचा 

बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर, भुजबळांच्या कार्यकर्त्याचे हॉटेल पेटवले

गरीब मराठ्यांसाठी तुमचं असणं अपरिहार्य..असे जरांगेंना का म्हणाले प्रकाश आंबेडकर

राजीनामे देणारे आमदार-खासदार जरांगेंचे ऐकणार का?

मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन 

दरम्यान, सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण आणि कुणबी दाखले शोधणे अशा दोन पातळीवर सरकारचं काम सुरु आहे. मराठा आंदोलकांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, शांतता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी