मुंबई

सुधागडच्या जवानाचा जगात डंका; बनला युनोचा शांतता सैनिक

अंगात मेहनत घेण्याची मनीषा असेल तर अशक्य असणारी कोणतीही गोष्ट माणूस साध्य करू शकतो. त्याच्या पंखात उंच आकाशात झेप घेण्याचे सामर्थ्य येते ते मेहनत, जिद्दीने. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रासळ या गावच्या सुशिल कृष्णा तेलंगे याने ते संधी करून दाखवले आहे. शेतकरी कुटुंबात अत्यंत हालाखीत आई-वडिलांनी मेहनत करून त्याला भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी पाठवलं. तो भारतीय सैन्यात दाखलही झाला. आता त्याच्या करिअरची 10 वर्षे पूर्ण होत असतानाच आफ्रिकेतील सुडान प्रांतात युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेचा शांतता सैनिक म्हणून त्याची निवड झाल्याने त्यानं 2017 साली पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरलं आहे.

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रासळ, रामनगरमधील व कृष्णा विठ्ठल तेलंगे व सुलभा कृष्णा तेलंगे यांचे सुपुत्र सुशील कृष्णा तेलंगे यांना बारावी पास नंतर 2013 साली तेरावीला बीएससीला शिकत असताना भारतीय सैन्य दलाची ओढ लागली. आई-वडीलांसोबत चार बहिणींच्या पाठी एकटा भाऊ. त्यात घरची परिस्थिती हलाखीची होती. तरीही आपल्या ध्येयाशी ठाम राहून घरच्यांच्या पाठिंब्याने जिद्द करून भारतीय सैन्य दलात भरती झालेला सुशिल ट्रेनिंग घेत असताना खर्चाच्या बाबतील वडिलांच्या आणी बहिणींच्या मदतीने पुढे जात राहिला.

ट्रेनिंगनंतर (एचए) इलेक्ट्रिक मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून निवड झाली आणि नोकरीत कार्यरत असताना पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो भारतीय सैन्यदलात दाखल झाला. आज भारतीय सैन्य दलात दहा वर्ष पूर्ण झाली आणि आज भारतीय सैन्य दलातून वयाच्या 29 व्या वर्षी आफ्रिका,सुडान देशात युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये शांतता सैनिक म्हणून निवड झाली आहे.

सुशिलने 2017 साली पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले. आज कुटुंबात आई, वडील, पत्नी आणि  एक मुलगा असा परिवार आहे.  चारही बहिणींची लग्न होऊन त्यातील दोन बहिणी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून सेवेचे काम करतात. तसेच तो इलेक्ट्रिक मॅकेनिकल इंजिनीअर असल्याने सैन्य दलाची सेवा पूर्ण झाल्यावर एखादा कारखाना उभा करून चार कुटुंबांना   रोजगार मिळवून देण्याचा  प्रयत्न करणार असल्याचे सुशिलने सांगितले.

हे सुद्धा वाचा
टोलच्या नथीने सरकारचा ठाकरे सेनेवर हल्ला
‘समाजामध्ये मुघलांसारखी फुट पाडु नका,’ प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांवर टीका
आली रे आली ‘सिंघम अगेन’ची हीरोइन आली!
सुशिलसारखे सुधागड तालुक्यातील अनेक तरुण सैन्यभरतीकडे वळत आहेत. ठाण्यातील सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे ही संस्था सुधागड तालुक्यातील मुलांना सातारा येथे मिलिटरी प्रशिक्षणासाठी पाठवित आहे. यामध्ये काही मुले सैन्यात दाखलही झाली आहेत. त्यामुळे सुधागड तालुक्याचे नावही आता जगाच्या नकाशावर झळकत आहे. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी-धंद्याकडे न वळता सैन्यात भरती होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे हे गावागावात जावून, शाळांमधील शिबीर, कार्यक्रमांतून करतात. त्यास चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे समाधान ते व्यक्त करतात.

 

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

15 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

15 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

16 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

16 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

16 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

18 hours ago