मुंबई

चार महिन्यांचे लेकरु डोळ्यासमोर वाहून गेलं; आईने फोडला हंबडरडा

ठाणे जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पाऊस सुरु झाला असून याचा परिणाम लोकल सेवा ठप्प झाल्याने कल्याणच्या पत्रिपुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर उतरून चालत स्टेशन गाठण्याच्या प्रयत्नात अवघ्या चार महिन्यांचे बाळ एका मातेसमोर हातातून निसटले आणि नाल्यात पडून वाहून गेले. दुपारी नाल्याजवळच्या खाडीला भारती असल्याने बाळाच्या शोधासाठी अनंत अडचणी येत होत्या, पण दुपारनंतर ही शोधकाम सुरूच होते. या घटनेचा व्हिडिओ वायरल होताच अनेकजण हळहळले.. अनेकांनी ही बाळ सापडावे अशा करुणा देवाकडे भाकल्या.

सकाळपासून ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. त्यातच ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान एका मागोमाग एक लोकल रांगेत उभ्या राहिल्या होत्या. बराच वेळ होऊनही लोकल जागेवरून हालत नसल्याने अखेर त्यातील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालत कल्याण स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे अंबरनाथ लोकलमधील काही प्रवासीही गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालू लागले. ज्यामध्ये चार महिन्यांचे छोटं बाळ घेऊन आजोबा आणि त्या बाळाची आईही होती.

त्यावेळी पत्री पुलाजवळ कल्याण दिशेकडील स्लो ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकलच्या डाव्या बाजूने हे कुटुंब जात असताना ही दुर्घटना घडली. ही लोकल उभी असलेल्या ट्रॅकच्या खालून एक नाला वाहत होता आणि तो पार करण्यासाठी लोकलच्या डाव्या बाजूने अगदी अरुंद अशी जागा होती. त्या अरुंद जागेतून बाळाला घेऊन चालताना आईला काहीशी अडचण झाली. त्यामुळे त्याच्या आजोबांनी त्या बाळाला आपल्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार आजोबांकडे हे बाळ देत असताना अचानक हातून बाळ निसटले आणि नाल्याच्या पाण्यात पडले आणि दोघांच्याही काळजात धस्स झाले. तिथे असणाऱ्या काही मुलांनी त्या नाल्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन शोधाशोध केली. पण त्यांना यश काही आले नाही.

हे सुद्धा वाचा

तीस्ता सेटलवाड यांना नियमीत जामीन; गुजरात उच्च न्यायालयाबद्दल काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

मुंबई पोलीस लावणार सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाचा छडा

अबू आझमींनी पुन्हा वंदे मातरम् वाद उकरून काढला; सभागृह 10 मिनिटासाठी तहकूब  

आपल्या पोटचा गोळा पाण्यात पडल्याचे समजताच ती आई तर धाय मोकलून रडू लागली. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी ती अक्षरशः त्या नाल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती. तर हा सगळा प्रसंग घडत असताना तो पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच अश्रूंचा बांध फुटला. त्या आईच्या आर्त किंकाळीने सर्वांचेच काळीज अक्षरशः पिळवटून टाकले. दरम्यान प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून स्थानिक कोळी बांधव, अग्निशमन दलाकडून बाळाचा कसून शोध घेतला जात आहे. तर काही तरी चमत्कार व्हावा आणि हे बाळ सुखरूप मिळावे अशी मनोमन प्रार्थनाही सर्वजण करीत आहेत.

विवेक कांबळे

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

7 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

8 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

10 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

11 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

11 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

12 hours ago