मुंबई

राज ठाकरे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर ; पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर २०१४ साली झालेल्या तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांना न्यायालयाने वॉरंट बजावले होते. राज ठाकरे हे आज बेलापूर न्यायालयात दाखल झाले होते. राज ठाकरेंनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी केली जाणार आहे.

जानेवारी २०१४ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात टोलनाक्याच्या संदर्भात भाष्य केलं होतं. त्या प्रकरणात न्यायालयात आज सुनावणी झाली.

राज ठाकरे यांनी न्यायालयात दोन अर्ज केले होते. पहिला अर्ज जामिनासाठी होता तर दुसरा अर्ज हा पुढच्या वेळी सुनावणीला हजर न राहण्याचा होता. त्यांचे दोन्हीही अर्ज हे मंजूर झाले आहेत. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर राज ठाकरेंना जामीन मंजूर झाला आहे. तसेच आता त्यांना या प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीला हजर राहण्याची गरज नसणार आहे.

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

वाशी न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कुणालाही आत जाण्यास परवानगी नाही. त्यासोबतच न्यायालयाबाहेर बॅरिगेटिंग लावण्यात आली आहे. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित असल्याची माहिती आहे.

राज ठाकरेंचे मनसैनिकांकडून स्वागत

महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरेंचा हा नवी मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान मनसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. मनसैनिक न्यायालयाबाहेर दाखल झाले आहेत. वाशी टोलनाक्यावर राज ठाकरेंचे मनसैनिकांकडून स्वागत करण्यात आले.

कोर्टाने हजर राहण्याचा समन्स बजावला होता

30 जानेवारी 2014 ला वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये प्रोक्षोभक वक्तव्य केल्यामुळे राज ठाकरे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरे यांना जबाब नोंदवण्यासाठी कोर्टाने हजर राहण्याचे समन्स बजावले.

राज ठाकरे हे आज न्यायालयात हजर राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जात आहे.

राजीक खान

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

6 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

6 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

6 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

7 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

9 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

9 hours ago