राजकीय

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिल्या ‘या’ शुभेच्छा; म्हणाले…

मुंबई: नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळं या जागेसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुन्हा सक्रिय झाला असून ‘आम्ही फासे पलटवणार’ असं सूचक वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांच्या त्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत  यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा अध्यक्षपदावरून फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याकडं पत्रकारांनी राऊत यांचं लक्ष वेधलं. त्यावर, ‘फडणवीसांना त्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत,’ असं राऊत म्हणाले.

‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात काँग्रेसमधील फेरबदलाचे विश्लेषण करताना शिवसेनेनं बाळासाहेब थोरात यांचं कौतुक केलं आहे. तसंच, नाना पटोले हे भाजपमध्ये जाऊन आले आहेत याकडंही लक्ष वेधलं आहे. ही टीका आहे का असं विचारलं असता राऊत यांनी नकारार्थी उत्तर दिलं.

‘नानांवर टीका केलेली नाही. त्यांचं कौतुकच केलंय. प्रश्न काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याचा आहे. नानांचा उत्साह महत्त्वाचा आहे. नाना हे एक झुंजार नेते आहेत. पक्षाला ऊर्जा देण्याचं काम त्यांनी करावं,’ असं संजय राऊत म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी लागणार असल्यानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज आहेत का, यावर प्रश्नावर राऊत यांनी सावध उत्तर दिलं. ‘घटनात्मक पदावरच्या निवडणुका वारंवार होऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे.

अध्यक्षपद पाच वर्षांसाठी असतं. मध्येच राजीनामा दिल्यास पुन्हा निवडणूक घ्यावी लागते. सभागृहात महाविकास आघाडीचं बहुमत आहे पण तरीही अशा गोष्टी टाळायला हव्यात,’ असंही राऊत म्हणाले.

राजीक खान

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

7 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

7 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

7 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

8 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

10 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

10 hours ago