राष्ट्रीय

ओडिशा रेल्वे अपघातप्रकरण, सिग्नल यंत्रणा विभागातील जुनियर इंजीनियरचं घर सीबीआयने केलं सील

ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी सिग्नल यंत्रणेतील दोषमुळे झालेल्या रेल्वे अपघातात २९२ प्रवाशांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. यानंतर पाच प्रवाशांचा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय १२०८ प्रवासी जखमी झाले आहेत. यात सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू असतानाच सीबीआयने सोमवारी (१९ जून) मोठे पाऊल उचलले असून रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल जुनियर इंजीनियरचं घर सील केलं आहे. बालासोरमध्ये भाड्याच्या घरात राहणारा हा इंजीनियर सीबीआय चौकशीनंतर कुटुंबासह बेपत्ता आहे. सीबीआय त्याचा शोध घेत आहे. तो सापडल्यावर या अपघातातील सत्य माहिती समोर येऊ शकते.

सीबीआयच्या प्राथमिक तपासात या जुनियर इंजीनियरची चौकशी करण्यात आली होती. सोमवारी सीबीआय पथक पुन्हा आल्यानंतर हा इंजीनियर त्याच्या घरी आढळला नाही. सीबीआयने इंजीनियरचं घर सील केलं आहे. दरम्यान, ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता २९२ वर पोहचली आहे. रविवारी (१९ जून) पश्चिम बंगालमधील २४ वर्षीय गंभीर जखमी प्रवाशाचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. अपघात घडला तेव्हा २८७ प्रवाशांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. यानंतर पाच प्रवाशांचा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय १२०८ प्रवासी जखमी झाले आहेत.

हे सुध्दा वाचा:

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे, जाणून घ्या पावसाबद्दल नवीन अपडेट

उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळणार नाही; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या अनियमिततेची एसआयटी चौकशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

सीबीआयने ६ जून रोजी बालासोर रेल्वे अपघाताच्या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला. या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. अपघातानंतर सिग्नल यंत्रणेशी छेडछाड झाल्याचा आरोप झाल्यानंतर सीबीआयकडे तपास गेला. सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर रेल्वे स्टेशनही सील करण्यात आलं होते. सिग्नल यंत्रणेशी संबंधित इंटरलॉकिंग पॅनलही सील करण्यात आले होते.. तसेच पुढील सूचना येईपर्यंत कोणतीही ट्रेन बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर थांबवली जाणार नाही. असे सूचित करण्यात आले होते.

रेल्वेअपघात कसा झाला

शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडळ एक्सप्रेस चेन्नईकडे जात होती. ही रेल्वे ट्रॅकवरून उतरून मालगाडीवर धडकली. प्रवासी रेल्वेचे इंजीन मालगाडीवर चढले. कोरोमंडळच्या काही बोगीज ट्रॅकवर पलटल्या.
बेंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस बाजूच्या ट्रॅकने हावडाकडे जात होती. दरम्यान, हावडा एक्सप्रेसची टक्कर कोरोमंडल एक्सप्रेसच्या बोगींशी झाली. या धडकेत कोरोमंडल एक्सप्रेसच्या बोगी ट्रॅकवरून उतरल्या.
हा अपघात बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार स्टेशनवर झाला. हे ठिकाण कोलकात्यावरून दक्षिणेला २५० किलोमीटर आणि भूवनेश्वरवरून उत्तरेला १७० किलोमीटर अंतरावर आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कोरोमंडलच्या बोगी संध्याकाळी ६.५५ वाजता ट्रॅकवरून उतरल्या. दुसरीकडे, बेंगळुरू-हावडा एक्सप्रेसच्या बोगी ७ वाजता ट्रॅकवरून उतरल्या. हा अपघात पाच मिनिटानंतर झाला.

रसिका येरम

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

2 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

2 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

2 hours ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

3 hours ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

3 hours ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

3 hours ago