31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईमुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या अनियमिततेची एसआयटी चौकशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या अनियमिततेची एसआयटी चौकशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात आलेल्या कामांमध्ये १२ हजार २४ कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचे कॅगने निदर्शनास आणून दिले होते. कोरोना काळातील या कामांमध्ये अनियमितता असल्याचे आरोप झाल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने कॅगमार्फत अहवाल मागविला होता. त्यानंतर आता अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजप आमदारांनी पालिकेच्या विविध कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कॅग चौकशीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती. महापालिकेमध्ये विविध विभागामार्फत नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले होते.

यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते. यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हा शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्याला यश; तळीयेतील ६६ दरडग्रस्तांना मिळणार हक्काची घरे

भगतसिंग कोश्यारी यांना दानवेंचे शुभेच्छा पत्र; ‘जागतिक गद्दारी दिना’साठी ‘युनो’कडे प्रयत्न करण्याची मागणी

‘आदिपुरुष’चे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांची मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

कोरोना काळात मुंबई महापालिकेने कोरोना केंद्र उभारणे, कोरोना केंद्रांवर औषधे, साहित्य खरेदी करणे, कोरोना केंद्र उभारण्यासाठी कंत्रांट देणे, रस्त्यांची कामे अशा अनेक कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या कामांची चौकशी कॅग मार्फत करण्यात आली. कॅगने पालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध विभागांच्या कामांमध्ये १२ हजार २४ कोटी रुपये इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचा अहवाल दिला होता. दरम्यान अहवालानंतर आता याप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशीला मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मंजुरी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी