राष्ट्रीय

रमेश पतंगे यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते त्यांनी पद्मश्री सन्मान स्वीकारला. (Patrakar Ramesh Patange PadmaShri)

रमेश पतंगे हे हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार त्यांना  प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाबरोबरच मध्यप्रदेश शासनानेही राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.

 

संघ विचारधारेचे प्रतिनिधीत्व करणारे आणि ती ठामपणे विविध लेखांतून, भाषणांतून आणि पुस्तकातून मांडणारे रमेश पतंगे यांनी आतापर्यंत लहान-मोठया 60 पुस्तकांचे लेखन केले आहे. संविधान या विषयावरील “आम्ही आणि आमचे संविधान” व “स – संविधानाचा” ही त्यांची दोनही पुस्तके खपाचा विक्रम करणारी झालेली आहेत. सर्व सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत संविधान संकल्पनेचा परिचय त्यांनी करून दिला आहे.

Patrakar Ramesh Patange PadmaShri, रमेश पतंगे यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, Ramesh Patange PadmaShri Sanman, Saptahik Vivek Sampadak ,

 

 

 

विक्रांत पाटील

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

1 hour ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago