सीबीआयकडून व्हिडिओकॉनच्या वेणुगोपाल धूत यांना अटक; बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई

सीबीआयकडून व्हिडिओकॉनच्या वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे. (Videocon CEO VenuGopal Dhut) सीबीआयने बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. धूत हे व्हिडिओकॉनचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) व संस्थापक आहेत.

सीबीआयने यापूर्वीच आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांना पतीसह अटक केली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. कोचर सीईओ असताना नियम डावलून वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन कंपनीला आयसीआयसीआय बँकेचे साडेतीन हजार कोटींचे कर्ज दिले गेले होते. त्याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना आर्थिक फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात आता सीबीआयने कोचर दांपत्यापाठोपाठ वेणूगोपाल धूत यांना अटक केली आहे.

भारतातील पहिल्या महिला बँक सीईओ बनलेल्या चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची न्यू रिन्युएबल कंपनी आहे. धूत यांना नियमबाह्य कर्जाच्या बदल्यात कोचर यांच्या कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली. चंदा आणि दीपक कोचर यांच्यावर गुन्हेगारी कट रचल्याचा तसेच आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या दोघांसह आता वेणूगोपाल धूत यांनाही सीबीआयकडून कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक केल्याचे सीबीआय सूत्रांनी “लय भारी”ला सांगितले.

हे सुद्धा वाचा : 

बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही, महाजन यांचा खुलासा

पीएमसी बँकेत १ कोटी अडकल्याने महिला डॉक्टरची आत्महत्या

आगामी निवडणुकीत सुपर गद्दार, निर्लज्ज पुरंदरच्या बापूला गाडायलाच हवे !

व्हिडिओकॉनचे शेअरधारक असलेले अरविंद गुप्ता यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये या प्रकरणाचा भांडाफोड केला. सेबी, आरबीआय आणि पंतप्रधान कार्यालयास पत्र लिहून त्यांनी कोचर-धूत साटेलोटे यंत्रणांच्या लक्षात आणवून दिले. मार्च 2018 मध्ये याच प्रकरणात आणखी एका तक्रारदाराने आयसीआयीआय बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापन मंडळाकडे तक्रार केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने हे प्रकरण चव्हाट्यावर येऊन विविध यंत्रणांनी तपास सुरू केला. आधी कोचर यांच्या बचावात असलेली बँक जसजसे पुरावे हाती येऊ लागले, तसतशी मागे हटली आणि कोचर गोत्यात आल्या.

Videocon CEO VenuGopal Dhut arrested by CBI in ICICI Bank Loan Fraud

विक्रांत पाटील

Recent Posts

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

4 hours ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

5 hours ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

5 hours ago

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

6 hours ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

6 hours ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

7 hours ago