क्रीडा

Cristiano Ronaldo : क्लब क्रिकेटमध्ये रोनाल्डोचा जलवा सुरूच! रचलाय नवा विश्वविक्रम

जगभरात सर्वात लोकप्रिय असणारा खेळ म्हणजे फुटबॉल. फुटबॉल या खेळाला जगभरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळत असते. याच कारणामुळे जगभरातील विविध फुटबॉलपटूंचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, या सर्व फुटबॉलप्रेमींमध्ये एक नाव असे आहे ज्याच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. तो खेळाडू म्हणजे सध्याचा फुटबॉलमधील सर्वोत्कृष्ट खेलाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो. ख्रिस्तियानो रोनाल्डोने फुटबॉल जगतात आणखी एक मोठी कामगिरी नोंदवली आहे. क्लब फुटबॉलमध्ये 700 गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने रविवारी इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात एव्हर्टनविरुद्ध गोल करत हा मोठा विक्रम केला. त्याच्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडनेही सामना जिंकला.

37 वर्षीय रोनाल्डोने 20 वर्षांपूर्वी स्पोर्टिंग लिस्बनमधून आपल्या क्लब फुटबॉल कारकिर्दीला सुरुवात केली होती. या 20 वर्षांत, तो स्पोर्टिंगमध्ये तसेच मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि जुव्हेंटसकडून खेळताना दिसला. त्याने एकूण 944 सामने खेळले आणि 700 गोल केले.

कोणत्या क्लबसाठी किती गोल?
रोनाल्डोने पोर्तुगालच्या फुटबॉल क्लब स्पोर्टिंग लिस्बनसाठी 5 गोल केले. एका हंगामानंतर, त्याला मँचेस्टर युनायटेडने आपल्या संघात समाविष्ट केले. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मँचेस्टर युनायटेडसाठी एकूण 144 गोल केले. स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदकडून खेळताना त्याने 450 गोल केले. तो रिअल माद्रिदसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडूही आहे. माद्रिदनंतर त्याने इटालियन फुटबॉल क्लब जुव्हेंटससाठीही 101 गोल केले आहेत.

50 वेळा हॅटट्रिक
रोनाल्डोने त्याच्या क्लब फुटबॉल कारकिर्दीत एकूण 50 हॅटट्रिक्स केल्या आहेत. 700 पैकी 129 गोल पेनल्टी स्पॉटद्वारे झाले. चॅम्पियन्स लीगमध्येही तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. येथे त्याने 183 सामन्यात 140 गोल केले आहेत. या बाबतीत तो लिओनेल मेस्सीपेक्षा 13 गोलने पुढे आहे.

2024 पर्यंत खेळण्याचा मानस आहे
रोनाल्डो हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू आहे. त्याने पोर्तुगालसाठी 189 सामन्यात 117 गोल केले आहेत. अलीकडेच रोनाल्डोने असेही सांगितले की सध्या फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही आणि युरो 2024 पर्यंत त्याला आपल्या देशासाठी खेळायचे आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे RSS चे एजंट

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा, म्हणजेच पाचवा टप्पा उरलेला आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे व उत्तर…

5 mins ago

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात…

15 mins ago

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

45 mins ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

2 hours ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

3 hours ago