क्रीडा

कामरान अकमलने केली पीसीबीची कानउघाडणी, म्हणाला -‘बीसीसीआयकडून शिका’

पाकिस्तान क्रिकेटची स्थिती खूपच खराब आहे. पाकिस्तान कोणताही सामना जिंकू शकत नाही आहे, या उलट या संघातील खेळाडूमध्ये नेहमी वाद सुरु असतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठं मोठ्या गोष्टी करतो, पण त्याची अवस्था फार वाईट आहे. सध्याची परिस्थिती पाहून माजी पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलने पीसीबीची कानउघाडणी करत बीसीसीआयकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. (kamran akmal slams pakistan cricket board)

केवळ 1 बळी… आणि कानपूरमध्ये अनोखा विक्रम रचणार रवींद्र जडेजा!

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या खराब स्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. अकमलने पीसीबीवर अनेक आरोप केले आहेत. त्याचे असं म्हणणे आहे की पीसीबीकडे कोणताही गेम प्लॅन नाही किंवा ते योग्य प्रकारे संघ निवडत नाही. (kamran akmal slams pakistan cricket board)

अकमल म्हणाला, “पीसीबीला संघाची निवड नीट करता येत नाही. त्यांचा गेम प्लॅनही शून्य आहे. पीसीबीने आधी आपली गेम जागरूकता सुधारली पाहिजे आणि अशा स्थितीत तुम्ही येऊन बैठकीला बसलात. तुम्ही जर खेळाडूंना बोलवणार तर ते नक्की येणारच.” (kamran akmal slams pakistan cricket board)

‘विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकाशदीप

“पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयकडून खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या निवडीसह बरेच काही शिकण्याची गरज आहे. ही वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे संघ नंबर-1 बनतो आणि जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा निर्माण होतो. पीसीबीने एक चांगला संघ कसा निवडावा? जर त्यांना हे करायचे आहे, त्यांनी ते बीसीसीआयकडून शिकले पाहिजे.” (kamran akmal slams pakistan cricket board)

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. जिथे, 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. बांगलादेशने पाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. (kamran akmal slams pakistan cricket board)

या पराभवानंतर क्रिकेट जगतात त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार आहे, त्यासाठी तो प्रायोजकाच्या शोधात आहे. (kamran akmal slams pakistan cricket board)

काजल चोपडे

Recent Posts

विराट कोहलीचे ‘हे’ कौशल्य पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे.…

18 mins ago

Ladki Bahin योजना निवडणुकीपुरती | १५०० दिले, अन् तेल, साखरचे दर वाढवले | मागचेच सरकार चांगले

लय भारी चे संपादक तुषार खरात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निढळ या गावी नुकताच दौरा केला(Ladki…

53 mins ago

Shambhuraj Desai | Satyajeet Pathankar | जनतेच्या मनातील आमदार कोण ?

लय भारी चे संपादक तुषार खरात हे पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागात नुकताच दौरा केला(Who…

1 hour ago

Mahesh Shinde गद्दार | Shashikant Shinde निष्ठावंत | कोरेगाव मतदारसंघात कुणाचं वारं ?

लय भारी चे संपादक तुषार खरात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निढळ या गावी नुकताच दौरा केला(Whose…

1 hour ago

Jaykumar Gore | मेढपाळासोबत गप्पा | मेलेला मुडदा मतांसाठी उकरून बाहेर काढतील |

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे. मीच…

2 hours ago

केवळ 1 बळी… आणि कानपूरमध्ये अनोखा विक्रम रचणार रवींद्र जडेजा!

भारत आणि बांगलादेश यांच्या दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारत ने कसोटीचा पहिला…

4 hours ago