क्रीडा

MS DHONI : पाकिस्तानच्या शोएब मलिकची तुलना थेट एमएस धोनीसोबत! माजी खेळाडूच्या वक्तव्याने हाहाकार

गेल्या काही काळात भारतीय क्रिकेट संघाने जगभरात आपली छबी उमटवली आहे. विशेष म्हणजे संघासोबत अनेक खेळाडूंनी देखील जगभरात नाव कमावले आहे. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात भारतीय खेळाडूंचे चाहते आहेत. अशा परिस्थितीत गेल्या काही काळात पाकिस्तानी संघातील काही आजी माजी खेळाडूंची तुलना भारतातील दिग्गज खेळाडूंसोबत केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमची तुलना भारताचा दिग्गज फलंदाजी आणि माजी कर्णधार विराट कोहलीसोबत केली. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल याने पाकिस्तानी अषटपैलू खेळाडू शोएब मलिकची तुलना थेट जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू महेंद्रसिंग धोनी याच्यासोबत केली आहे.

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकचा टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात समावेश करण्यात आलेला नाही. यावर क्रिकेटपटू कामरान अकमल खूश नाही. त्याने म्हटले आहे की जेव्हा एमएस धोनी इतक्या वयात आयपीएलमध्ये खेळू शकतो, तर शोएब मलिक पाकिस्तानी संघाचा भाग का असू शकत नाही. शोएब मलिकला आशिया कपमधूनच पाकिस्तान संघात आणण्याची मागणी होत आहे. पाकिस्तानची मधली फळी मजबूत करण्यासाठी शोएब मलिक संघात असायला हवा, असे कामरान अकमलसह अनेक माजी क्रिकेटपटूंचे मत होते. मात्र, शोएब मलिकला टी-20 विश्वचषक संघात स्थान देण्यात आले नाही.

हे सुद्धा वाचा

Supreme Court : ठाकरे गटाच्या वकीलांकडून शिंदेगटाची कोंडी!

Tollywood Actor In Marathi Film : मृण्मयीच्या आगामी चित्रपटात झळकणार दाक्षिणात्य अभिनेता

PFI : तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा ‘पीएफआय’ ला केले खिळखिळे

कामरान अकमलच्या मते शोएब मलिकचे वय बघू नये. त्याने यासाठी एमएस धोनीचे उदाहरण दिले आणि सांगितले की, “तो या वयात खेळत आहे तेव्हा शोएब मलिकमध्ये काय कमतरता आहे.” क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत कामरान अकमल म्हणाला की, “इंग्लंडचे लोक ऍलिस्टर कुकला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळवले जात आहे. ते काय वेडे आहेत? धोनी आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याला क्रिकेट सोडून दोन वर्षे झाली. त्यांना कोणी खेळू नको म्हणत आहे का? आम्हाला माहित नाही की येथे वयाचा मुद्दा काय तयार केला जात आहे. शोएब मलिकचा फिटनेस आणि फॉर्म योग्य नाही का? जर तो पाकिस्तानसाठी चांगला खेळाडू असेल तर त्याला संघात स्थान द्यायला हवे.”

दरम्यान, पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान पाकिस्तानसाठी चांगली कामगिरी करत आहेत पण संघाला मधल्या फळीत अडचणी येत आहेत. अनेक फलंदाजांनी प्रयत्न केले आहेत परंतु आतापर्यंत एकाही फलंदाजाकडून उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे सातत्याने शोएब मलिक याला संघात स्थान देण्याची मागणी केली जात आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

16 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

16 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

17 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

17 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

18 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

19 hours ago