30 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमनोरंजनTollywood Actor In Marathi Film : मृण्मयीच्या आगामी चित्रपटात झळकणार दाक्षिणात्य अभिनेता

Tollywood Actor In Marathi Film : मृण्मयीच्या आगामी चित्रपटात झळकणार दाक्षिणात्य अभिनेता

एक दाक्षणात्य अभिनेता मराठी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे. अनुपसिंग ठाकूर असे या अभिनेत्याचे नाव आहे. अनुपसिंग ठाकूरने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.

सध्या मराठी सिनेसृष्टीत अनेक विविध बदल होताना दिसत आहेत. खासकरून हे सर्व बदल सकारात्मक असून मराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस मिळवून देत असल्याचेही जाणवत आहे. गोल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपली कला मराठी सिनेमातून दाखवण्याचे काम केले. अशातच आता एक दाक्षणात्य अभिनेता मराठी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे. अनुपसिंग ठाकूर असे या अभिनेत्याचे नाव आहे. अनुपसिंग ठाकूरने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. अनेक विविध बॉडीबिल्डींग स्पर्धघांमधूनही त्याने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.आता तो मराठी सिनेसष्टीत आपल्या नावाची छबी उमटवणाऱ्या मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे यांच्यासह मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

शशिकांत पवार पॉडक्शन प्रस्तुत आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘बेभान’ या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अनुपसिंग ठाकूर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मधुकर देशपांडे आणि शशिकांत पवार यांनी या चित्रपटचाची निर्मिती केली आहे. ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’ यांच्यासारखे सिनेमे दिल्यानंतर दिग्दर्शक अनुप जगदाळे आता ‘बेभान’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी सज्ज आहेत. शिवाय अनुप जगदाळे यांच्या आगामी ‘रावरंभ’ सिनेमाची देखील सर्वत्र चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

Navratri 2022 : खळबळजनक! नवरात्रीनिमित्त खरेदी केलेल्या उपवासाच्या पदार्थातून विषबाधा

Women Singer Allegation : ‘स्वत:च्या सुरक्षारक्षकाने मला नग्नावस्थेत पाहिलेले’ गायिकेने केलाय धक्कादायक खुलासा

Ashok Gehlot : अशोक गेहलोत यांचे ‘मुख्यमंत्री’ पद वाचले

दरम्यान, बेभान सिनेमाची कथा दिनेश देशपांडे यांच्या लेखनीतून अवतरली असून पटकथा नितीन सुपेकर यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन आणि संकलक म्हणून विजय कोचीकर यांचटा सहभाग आहे. मंगेश कांगणे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना संगीतदिग्दर्शक एव्ही प्रफुल्लचंद्र यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून हा एक रोमँटिक सिनेमा असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. मात्र, अनुपसिंग याच्या सिनेमाचा इतिहास लक्षात घेता चित्रपचटात ऍक्शनचा समावेश असल्याचीशक्यता नाकारता येत नाही.

यासर्वांमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या नावाची छबी उमटवणारे रजणीकांत एक मराठी मूळाचा अभिनेता आहे. त्यामुळे आता मराठी माणसाने गाजवलेल्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नवोदित अभिनेते मराठी सिनेमात पदार्पण करत असल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावरून मराठी सिनेमासृष्टीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले असल्याचे मतही अनेक सिनेमाप्रेमींचकून व्यक्त केले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी