क्रीडा

नीरजच्या सुवर्ण कामगिरीवर आनंद महिंद्राची ट्विटर पोस्ट चर्चेत

भारताच्या नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये नवा इतिहास रचत भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक आपल्या नावे केल्यानंतर भारतासाहित जगभरातून त्यांचे कौतुक होत आहे. हंगेरीतील बुडापेस्ट येथे होत असलेल्या अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप २०२३ मध्ये सुवर्ण कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, २०२२ च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप मध्ये निरजने रौप्य पदक पटकावून या स्पर्धेत पदक मिळवणारा तो दूसरा भारतीय ठरला होता. पण यावेळी, थेट सुवर्णपदकाला गवसणी घालून त्याने कोट्यवधी भारतीयांना सुवर्णभेट दिली आहे. या सुवर्ण कामगिरीवर प्रभावित होऊन प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विटर वर एक खास पोस्ट करत नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंट वर पोस्ट करीत आनंद महिंद्रा म्हणाले, “आज सकाळी माझे #MondayMotivation ह्या माणसाच्या विजयाशिवाय आणखी काय असू शकते? पण केवळ हे त्याने सुवर्ण जिंकले म्हणून नाही तर यश हे केवळ नैसर्गिक प्रतिभा असून मिळत नाही यांची आठवण करून देते. पूर्वतयारीमध्ये कुठल्याही तडजोडिशिवाय केलेल्या वचनबद्धतेचा हा परिणाम आहे. #NeerajChopra”

ट्विटरवर नीरज चोप्रा या हॅशटॅग वर मोठ्या प्रमाणात ट्विटस येत असून लाखों ट्विटर युजर नीरज चोपरावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.

कसा ठरला नीरज सुवर्ण विजेता

निरजने दुसऱ्या फेरीत ८८.१७ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदक आपल्या नावावर केले तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने ८७.८२ मीटर ची भालाफेक करून रौप्यपदक पटकावले. झेक रिपब्लिकच्या जेकब वॅडलेच याने ८४.१८ मीटर लांब भालाफेक केली. त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

निरजचा पहिला प्रयत्न फाउल ठरल्याने पहिल्या फेरीत तो १२ व्या स्थानी राहिला होता. स्पर्धेत इतक्या मागे पडूनही खचून न जाता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेत दुसऱ्या प्रयत्नात निराजने ८८.१७ मीटरचा थ्रो केला. त्याच्याइतका लांब थ्रो अन्य कोणत्याही स्पर्धकाला करता न आल्यामुळे विजयाची माळ आपसुकच निरजच्या गळ्यात पडली. निरजने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८६.३२ मीटर लांब भाला फेकला.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजव्यतिरिक्त डी. पी. मनू आणि किशोर जैना या भारतीय खेळाडूंचा देखील समावेश होता. यात किशोरने पाचवे तर मनूने सहावे स्थान पटकावले. किशोर जैना पाचव्या प्रयत्नात ८४.७७ मीटर भालाफेक करू शकला तर डी. पी. मनूने सहाव्या प्रयत्नात ८४.१४ मीटर चा थ्रो केला.

हे ही वाचा 

नीरजने रचला इतिहास; ठरला जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पटकावणारा पहिला भारतीय

ब्राझिलियन स्टार फुटबॉलर नेमार येणार भारतात

एशिया कपसाठी टीम इंडिया सज्ज; कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात ‘या’ खेळाडूंना संधी

नीरजच्या या कृतीने जिंकली सगळ्यांची मनं

सुवर्ण कामगिरीनंतर काय म्हणाला नीरज? 

निरजच्या या सुवर्ण कामगिरीमुळे भारतासह जगभरातून त्यांचे कौतुक होत आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नीरज म्हणाला, ” हेच एक पदक राहिले असल्याविषयी सर्वजन बोलत होते आणि आज तेही पूर्ण झाले. मी ९० मीटरचं टार्गेट अजूनही पूर्ण करू शकलो नाही, पण सुवर्णपदक जिंकलो. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता पुढे अजून बऱ्याच स्पर्धा आहेत आणि त्यात ९० मीटर भाला फेकण्याचा प्रयत्न नक्की करेन. त्या स्पर्धांमध्ये आणखी जास्त जोर लावेन.”

”पहिला थ्रो फेकताना तांत्रिक फाऊल झाला. त्यानंतर थोडा निराश झालो, परंतु मी स्वतःला अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी पूश केलं. भारतवासीयांना हे सांगू इच्छितो की, हे तुमचं पदक आहे. आज जागे राहून माझी मॅच पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे मी आभार मानतो,” असेही तो म्हणाला.

नीरज चोप्राने आतापर्यंत जिंकलेली पदके 

निरजने टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०२२ च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय, डायमंड लीग २०२२, आशियाई स्पर्धा २०१८, राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, आशियाई चॅम्पियनशीप २०१७, दक्षिण आशियाई स्पर्धा २०१६ आणि वर्ल्ड जुनीयर चॅम्पियनशीप २०१६ या स्पर्धांमध्ये निरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले होते.

VJTI च्या स्थापनेत महात्मा फुले यांचे योगदान

लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago