33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाब्राझिलियन स्टार फुटबॉलर नेमार येणार भारतात

ब्राझिलियन स्टार फुटबॉलर नेमार येणार भारतात

भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून ब्राझिलियन स्टार फुटबॉलर नेमार ज्युनिअर हा यावर्षी भारतात येऊन फुटबॉलचा सामना खेळू शकतो. नेमार याने नव्यानेच जॉइन केलेल्या सौदी अरेबियाच्या अल-हिलाल या संघाचा आशियाई चॅंपियन्स लीग स्पर्धेत भारताच्या मुंबई सिटी एफ सी शी सामना होणार आहे. त्यामुळे नेमार मुंबईविरुद्ध खेळण्यासाठी भारतात येऊ शकतो. गुरुवारी, २४ ऑगस्टला आशियाई चॅंपियन्स लीग स्पर्धेच्या गटातील फेऱ्यांचा ड्रॉ प्रसिद्ध झाला होता. यात ड गटात भारताच्या मुंबई सिटी एफसी या क्लबसह सौदी अरेबियाच्या अल-हिलाल, इराणी क्लब नसाजी मजनदराण आणि उझ्बेकिस्तान मधील नावबहोर या क्लब्सचा समावेश आहे.


नेमार ज्युनिअर याने नुकताच अल-हिलाल हा क्लब जॉइन केला आहे. याधीच्या, पॅरिस सेंट जर्मन या फ्रान्समधील संघातून बाहेर पडत या ३१ वर्षीय फुटबॉलपटूने सौदी अरेबियाच्या क्लबसोबत २ वर्षांचा करार केला आहे. या करारानुसार, नेमारला अल-हिलाल क्लबकडून दरवर्षी सुमारे १०० मिलियन युरो म्हणजेच सुमारे ९०० कोटी रुपये मिळणार आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याशिवाय, नेमारला अल हिलाल क्लबच्या वतीने राहण्यासाठी 25 खोल्यांचे घर, प्रवासासाठी खासगी जेट विमान दिले जाणार आहे. एवढेच नाही तर क्लबतर्फे या खेळाडूला ३ महागड्या गाड्याही देण्यात आल्या असून यामध्ये बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, अॅस्टन मार्टिन डीबीएक्स आणि लॅम्बोर्गिनी हुराकन यांचा समावेश आहे. याशिवाय नेमारने सोशल मीडियावर सौदी अरेबियाचा प्रचार केल्यास त्याला प्रत्येक पोस्टसाठी सुमारे साडेचार कोटी रुपये दिले जातील.

असे असणार मुंबईच्या सामन्यांचे वेळापत्रक

आशियाई चॅंपियन्स लीग स्पर्धेच्या गट फेरीतील सामने १८ सप्टेंबरपासून सुरू होतील. १८ सप्टेंबर् रोजीच मुंबईची पहिली लढत नसाजी मजनदराण सोबत पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. मुंबईची दुसरी लढत ३ ऑक्टोबर रोजी नावबहोर सोबत मारकाझी स्टेडियम येथे होणार आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी मुंबईचा सामना अल-हिलाल सोबत सौदीच्या प्रिन्स फैजल बिन फाहाद स्टेडियमवर होईल.

त्यानंतर, बहुप्रतीक्षित मुंबई सिटी विरुद्ध अल-हिलाल हा सामना ६ नोव्हेंबरला पुण्याच्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. हाच सामना खेळण्यासाठी स्टार फुटबॉलर नेमार ज्युनिअर भारतात येऊ शकतो. मुंबईचा यापुढील सामना २३ नोव्हेंबरला नसाजी मजनदराण सोबत आझादी स्टेडियम येथे होणार आहे. मुंबईची शेवटची साखळी लढत ४ डिसेंबरला नावबहोर सोबत बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे.

हे ही वाचा 

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप: नीरज चोप्रासहित डी. पी. मनू, किशोर जैना यांचा अंतिम फेरीत प्रवेश

एशिया कपसाठी टीम इंडिया सज्ज; कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात ‘या’ खेळाडूंना संधी

गोदावरी, एकदा काय झालं चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर; सांगलीच्या शेखर रणखांबेच्या रेखा माहितीपटाला पुरस्कार

फुटबॉलमाधील हुकूमी एक्का पोर्तुगीज स्टार ख्रिस्तीयानो रोंनाल्डो हा सुद्धा सौदी अरेबियातील क्लब अल-नासर तर्फे खेळतो. त्यामुळे यंदाच्या आशियाई चॅंपियन्स लीग स्पर्धेच्या निमित्ताने ख्रिस्तीयानो रोंनाल्डो भारत दौऱ्यावर येईल, अशीही चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, रोनाल्डोचा संघ अल-नासरचा समावेश ग्रुप-ई मध्ये झाल्याने तसे घडले नाही. तरीही, जर मुंबई सिटी एफसी क्लब आणि अल-नासर या दोन्ही संघांनी स्पर्धेत पुढेपर्यंत मजल मारली तर त्यांचा सामना एकमेकॅनविरुद्ध होऊ शकतो आणि त्यानिमित्ताने फुटबॉलप्रेमींचा लाडका ख्रिस्तीयानो रोंनाल्डो भारतात येऊ शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी