राजकीय

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधीपक्षाच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) घराबाहेर पडत नाहीत. वर्षा निवासस्थानात बसून राज्यातील परिस्थिती कळत नाही. अशा प्रकारची टीका विरोधकांकडून सातत्याने सुरू आहे. या टीकेला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे (Environment Minister Aditya Thackeray has replied).

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या दुर्घटना घडल्या. रुग्णालयांत झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली. परंतु मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला नाही. दुर्घटनेत नातेवाईक गमावलेल्या व्यक्तींचे सांत्वन केले नाही. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.

अजय देवगणकडून मुंबई पालिकेला 1 कोटी; दादरमध्ये उभारणार कोव्हिड सेंटर

महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण ; ठाकरे सरकारचा निर्णय!

“एखादी दुर्घटना झाली की त्या ठिकाणी एक यंत्रणा काम करत असते. तिथे पोलीस, मेडिकल टीम, प्रसारमाध्यमे काम करत असतात. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमच्यापैकी कोणीही तिथे गेले की आमच्यामागे यंत्रणा उभी राहते. व्हीआयपी व्यक्तीने भेट दिली की तिथे काम करणारी सगळी यंत्रणा डायवर्ट होते. दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्री, पालकमंत्री तिथे पोहोचून प्रत्येकाने जे काम करायचे असते त्यासंबंधी सूचना देत असतात. खूप वेळा वॉररुममध्ये राहून सर्व कामकाज कसे सुरु असते हे पाहायचे असते आणि सध्या तेच अपेक्षित आहे,” असे आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सांगितले.

Around 3,000 Covid infected have gone missing from Bengaluru, says minister

“फक्त आपल्याच नाही तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून (Chief Minister) हे होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सांगड घालून काम करायचे असते ते दोन्ही जागांवरील प्रमुख करत असतात,” असे ही आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सांगितले. पुढे ते म्हणाले की, “आम्ही गेल्यावर तिथे गोंधळ होतो. अर्धा पाऊण तास सगळे काही थांबलेले असते. आम्ही बाईट देत असतो, नंतर प्रसारमाध्यमे व्हीआयपी दौरा, टुरिझम अशी टीका करतात. सांत्वन फक्त टीव्हीवर येऊन करायचे नाही, तर कुटुंबाशी बोलून मदत कशी मिळेल हे पाहिले पाहिजे”.

“प्रत्येक जिल्ह्याचा एक पालकमंत्री असतो, तेथील काही ठराविक लोकप्रतिनिधी असतात. तिथे पोहोचून हवी ती मदत ते करत असतात. एकत्र काम केल्यानंतर प्रत्येकाने टीव्हीवर जाण्याची गरज नसते,” असे सांगत यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे (Aditya Thackeray has responded to the opposition’s criticism).

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

Rasika Jadhav

Recent Posts

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

19 hours ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

20 hours ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

3 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

3 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

3 days ago

लक्ष्मण हाके, तुम्ही आंदोलन करा; पण छगन भुजबळांसारख्या भ्रष्ट नेत्याला श्रेय देवू नका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी वर्षभरापासून रान पेटवलं होतं. पण जरांगे यांना ब्रेक लावण्याचं…

3 days ago