राजकीय

शाळा सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरला राज्यस्तरावर घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

टीम लय भारी

पुणेः राज्यातील शाळा सुरु (School reopen) करण्याचा निर्णय एवढे दिवस जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर सोपवण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील काही शहरांच्या शाळा (Maharashtra shcool) सुरु तर काही ठिकाणच्या बंद आहेत(Ajit Pawar: The decision to start the school will be taken on December 15 at the state level)

त्यामुळे राज्यभरात विविध पातळ्यांवर मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे आता राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळांसंदर्भात सरसकट निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरच घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच दिली. पुण्यात आज ते पत्रकारांशी बोलत होते.

Ajit Pawar : अजित पवारांची मोठी घोषणा ! पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार

Ajit Pawar : BMC मध्ये महाविकास एकत्र लढणार ? की…, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

बुधवारी कॅबिनेटमध्ये अंतिम निर्णय

राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भातला अंतिम निर्णय बुधवारी कॅबिनेट बैठकीत घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील यंत्रणांनाही कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत स्थानिक प्रशासनात मतभेद होण्यापेक्षा राज्य स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल. हा एकत्रित निर्णय राज्यातील सर्वच शाळांसाठी लागू असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबादच्या शाळांचा स्थानिक निर्णय काय?

नाशिक शहरातील महापालिकेच्या हद्दीतील शाळा 13 डिसेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं नुकताच घेतला आहे. तर औरंगबाद महापालिकेने 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहिल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल असे सांगितले. मुंबई आणि पुणे-पिंपरी-चिंचवड येथील शाळादेखील 15 डिसेंबर नंतर सुरु कऱण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. आता बुधवारी राज्य पातळीवर सरकार काय निर्णय घेईल, याकडे विविध शहरांतील स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar : जिल्हा नियोजन विकास निधीत कपात नाही 

Five of 7 Omicron patients in Pune test negative for Covid-19: Ajit Pawar

लसीकरणाकडे दुर्लक्ष झाल्यास राज्य कठोर निर्णय घेणार

औरंगाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 15 डिसेंबर पासून दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लस घेतली नसल्याचे आढळल्यास त्यांना 15 दिवसाला 500 रुपये या प्रमाणे दंड आकारला जाईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, औरंगाबाद लसीकरणात मागे असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. लोक इतरांना अजिबातच विचार करत नाही. राज्य पातळीवरही लसीकरणाचा वेग कमी झाल्यास असा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो.

टीम लय भारी

Share
Published by
टीम लय भारी

Recent Posts

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

2 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

2 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

3 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

4 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

5 hours ago