राजकीय

वाईन आणि दारू यात फरक असतो; अजित पवारांचा भाजपवर निशाणा

टीम लय भारी

पुणे : राज्यभरात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे भाजपाने या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली असताना आता राज्य सरकारकडून देखील जोरकसपणे भाष्य केले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील वाईन विक्री निर्णयाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे(Ajit Pawar targets BJP, difference between wine and liquor).

पुण्यात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. या मुद्द्यावर सगळ्यांचा गैरसमज झाल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. “वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं पिकवतात आणि याच द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते.तसेच आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. इतर राज्यांत आणि काही परदेशात वाईन निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती असून काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

90 कोटींचा आकडा ऐकून Ajit Pawar संतापले

“मी फार छोटा माणूस…” असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर लगावला टोला

महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी

‘No plan to do away with masks’: Ajit Pawar slams TV channels for ‘fake report’

“शेवटी आम्ही सरकारमध्ये काम करत असताना जनतेचं नुकसान असं काही करणार नाही. आपण निर्णय घेताना त्यात दारू नाही, तर वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण काही लोकांनी चुकीच्या व्हिडीओ द्वारे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न, सरकारबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे”, असा देखील दावा अजित पवार यांनी यावेळी बोलताना केला.

Team Lay Bhari

Share
Published by
Team Lay Bhari

Recent Posts

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

7 mins ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

3 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

3 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

3 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

3 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

4 hours ago