33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीय90 कोटींचा आकडा ऐकून Ajit Pawar संतापले

90 कोटींचा आकडा ऐकून Ajit Pawar संतापले

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाची (Coronavirus) साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळं राज्य आर्थिक संकटात असताना सरकार मधील मंत्र्यांच्या (Minister) बंगल्यांच्या डागडुजीवर (Renovation) 90 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. यावरुन विरोधी पक्षांनी नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (सोमवार) या प्रश्नावर संतप्त प्रतिक्रिया दिली.

मंत्र्यांच्या बंगल्यावर 90 कोटी रुपये खर्च झालेलाच नाहीत. या संदर्भात मी स्वत: माहिती घेतली. काहीही बातम्या दिल्या जातात. अद्याप कुठलाही आकडा पुढे आलेला नाही, मग हा 90 कोटी खर्चाचा आकडा आला कुठून ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्या सरकार मधील मंत्री आपापल्या सोयीनुसार व आवडीनुसार शासकीय बंगल्यांमध्ये व कार्यालयांमध्ये बदल करत असतात. त्यावर खर्चही बराच होतो. मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याने राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. विकासकामांसाठी पुरेसा निधी नाही. मात्र, मंत्र्यांच बंगले व दालनांची कामे 90 टक्के पूर्ण झाली असून त्यांची देयकेही दिली जात असल्याचे वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांचे नुतनीकरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी मात्र खर्चाचा हा आकडा फेटळला आहे. यात तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधिमंडळ अधिवेशनासाठी विधानसभेत जाण्याआधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरील आरोप फेटाळले

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन होणारे आरोप देखील अजित पवार यांनी फेटाळून लावले आहेत. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आधीच्या सरकारपेक्षा जास्त वकील महाविकास आघाडी सरकारनं दिले आहेत. हे प्रकरण जास्त चांगल्या प्रकारे मांडता यावं यासाठीच हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पण कोणाला राजकारण करायचं असेल तर त्यांना कोण रोखणार ? असा सवाल त्यांनी केला.

धनंजय मुंडे यांनीही केला खुलासा

सार्वजनिक बांधकाम विभागानं काही मंत्र्यांसह विरोधी पक्ष नेत्यांच्या एकूण 31 बंगल्यांच्या डागडुजीसाठी निविदा काढल्या त्या सादर होण्याआधीच कामाला सुरुवात झाल्याचे सांगितलं आहे. यामध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचाही यामध्ये उल्लेख आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचे सांगत फेटाळून लावलं आहे. तीन कोटी सोडा मी एक रुपयाही खर्च केलेला नाही, असं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी