राजकीय

सत्तेच्या राजकारणात ईडीने मालिकांना गाठले, अमोल कोल्हेंनी कवितेतून नवाब मलिकांना दिला पाठिंबा

टीम लय भारी

पुणे : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरावर आज सकाळी साडे सहा वाजता ईडीकडून धाड पडली. त्यांची देखील सुमारे तासभर चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात नेण्यात आले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडी कार्यालयात मलिकांची चौकशी सुरू आहे. या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत. खासदार अमोल कोल्हेंनी देखील त्यांना कवितेच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे(Amol Kolhe gave support to Nawab Malik through poetry).

भाजपा सत्तेसाठी ईडीचा वापर करत असून कोणतेच कारण नसताना मंत्र्यांच्या घरावर धाडी मारत आहेत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता भाजपाला बघवत नाही आहे, त्यासाठीचे हे उपद्याप सुरू आहे. असं कोल्हे म्हणाले. शिवाय तपासयंत्रणा या भाजपाच्या झाल्या असून तुमच्या नेत्यांच्या कोणत्याच भानगडी नाहीत का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच तुम्हीही कितीही प्रयत्न केलेत तरी राष्ट्रवादीचा रांगडा गडी तुम्हाला पुरून उरेल, असं अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितले आहे.

अंडरवर्ल्डशी कथित संबंध असलेल्या मालमत्तेप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना समन्स बजावले होते. आता या प्रकरणी नवाब मलिकची चौकशी केली जात आहे. त्या प्रकरणी ही चौकशी होत आहे. मात्र राष्ट्रवादी नेत्यांनी नवाब मलिक यांना पाठिंबा देत आपापली मते मांडली आहेत.

हे सुद्धा वाचा

रोहित पवारांचा घणाघात, उत्तर प्रदेशमधील सत्ता वाचवण्यासाठी भाजपने सूडबुद्धीने कारवाई केली

जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल, हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधात आहे

नवाब मालिकांचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टरमाईंड

Pawar alleges misuse of central agencies as ED questions Nawab Malik

Team Lay Bhari

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

1 hour ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

2 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

4 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

4 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

6 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

6 hours ago