राजकीय

रोहित पवारांचा घणाघात, उत्तर प्रदेशमधील सत्ता वाचवण्यासाठी भाजपने सूडबुद्धीने कारवाई केली

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आज सकाळपासून ईडीकडून जोरदार चौकशी सुरु आहे. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता ईडीने त्यांच्या राहत्या घरी धाड टाकली. आणि त्यानंतर चौकशीसाठी नवाब मलिक यांना ताब्यात देखील घेतले आहे(Rohit Pawar’s attack, BJP took revenge action to save power in UP).

दरम्यान, आता राजकारणात राष्ट्रवादी नेते आक्रमक झाले आहेत. सर्व जण आपापल्या प्रतिक्रीया देत आहे. बरेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते यावर नाराजी व संताप व्यक्त करत आहेत. तर याविरोधात आता राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे सूडाचं राजकारण असल्याचा आरोप होत आहे.

आमदार रोहित पवार यांनी ईडीच्या या कारवाईवर उत्तर प्रदेशात भाजपची होत असलेली पिछेहाट रोखण्यासाठीची धडपड असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात संदेश देण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्याला नोटीस देता ताब्यात घेऊ शकतो हे दाखवण्यासाठी असा प्रकार चालला आहे असंही रोहित पवार म्हणाले आहेत. आमचं नीट ऐका नाहीतर आम्ही कारवाई करू असा संदेश भाजपला द्यायचा असेल असे रोहित पवार म्हणाले(Rohit Pawar has reacted to this action of ED).

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

अधिवेशनात केलेल्या घोषणा म्हणजे जुमलेबाजी ,नवाब मलिक

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल, नवाब मलिकांचे धक्कादायक वक्तव्य

Central agencies targeting BJP’s political opponents like ‘mafia’: Sanjay Raut on Nawab Malik’s questioning by ED

महाराष्ट्रात मलिक यांनी ड्रग्ज रॅकेट प्रकरणी भाजप नेत्यांच्या पर्दाफाश केला होता, दरम्यान गुजरातमध्ये कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते, त्यामुळे भाजपला भीती वाटली असावी. म्हणूनच मलिक यांच्यावर ईडीचा जाब बसवण्यात येतोय. सत्तेत असताना अधिकाऱ्यांचा वापर करून विरोधकांना त्रास देण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. राजकीय दृष्टीकोनातून कारवाई करायची आणि याचा फायदा होणार भाजपला, असा रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. महाराष्ट्रात सत्ता हातात येत नाही तर नेत्यांवर कारवाई करायची अशी घाणेरडी कृत्य भाजपकडून केली जात आहेत असे रोहित पवार म्हणाले.

Team Lay Bhari

Share
Published by
Team Lay Bhari

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

59 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

2 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

4 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

6 hours ago