राजकीय

पडळकरांची बाळासाहेब थोरातांवर अश्लिल शब्दात टीका, प्रत्युत्तर देताना लेकीने ‘संस्कार’ दाखवले!

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून बाळासाहेब थोरात यांच्यावर अश्लिल शब्दात टीका केली होती. पडळकरांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांची लेक शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे (Balasaheb Thorat Lake Sharu Deshmukh has responded to Padalkar criticism).

राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण परत मिळवू देऊ शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही अशी घोषणा केल्याची आठवण त्यांना करुन दिली. दरम्यान यावरुन गोपीचंद पडळकर यांनी टीका केली असून त्याला बाळासाहेब थोरात यांच्या लेकीने उत्तर दिले आहे. त्यांच्या भाषेवरुन त्यांच्या संस्काराची ओळख होते, असे म्हणत वडिलांवरच्या टीकेला शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे (Sharu Deshmukh has responded to the criticism on his father). पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असे होते असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.

बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने पाणी पुरवठा योजनेसाठी 68 लाख 96 हजार निधी मंजूर

फडणवीसांच्या संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरून मविआच्या नेत्यांची टोलेबाजी

गोपीचंद पडळकर, बाळासाहेब थोरात आणि त्यांची लेक

पडळकर काय टीका केली

माझ्या हातात सूत्र द्या, ओबीसींची गेलेलं आरक्षण मिळवून देतो, नाहीतर राजकारणातून संन्यास घेतो, असे वक्तव्य फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना थोरात यांनी फडणवीसांना त्यांच्या जुन्या वाद्याची आठवण करुन देत वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नव्हतात, त्याचे काय झाले? असा सवाल केला होता. हाच सवाल पडळकरांच्या जिव्हारी लागला (The same question was asked by Padalkar).

बाळासाहेब थोरात यांच्या टीकेनंतर लागलीच पडळकर यांनी ट्विट करुन बाळासाहेब थोरातांवर हल्ला चढवला. ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ अशी टीका त्यांनी केली.

बाळासाहेब थोरातांनी महसूल विभागाला हायटेक करण्याबरोबर देशात अव्वल बनवले

Will not allow Devendra Fadnavis to take sanyas: Shiv Sena

गोपीचंद पडळकर आणि शरयू देशमुख

पडळकरांच्या टीकेला बाळासाहेब थोरातांच्या लेकीचे यांचं प्रत्युत्तर

पडळकरांच्या या टीकेला आता बाळासाहेब थोरातांच्या कन्येने सडेतोड प्रत्युत्तर देताना थेट त्यांचे संस्कारच काढले आहेत. ‘पात्रता पेक्षा जास्त मिळाले की असे होते. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ असे प्रत्युत्तर शरयू देशमुख यांनी ट्विटद्वारे दिले आहे (This reply was given by Sharu Deshmukh through a tweet).

कोण आहेत शरयू देशमुख?

शरयू देशमुख या बाळासाहेब थोरात यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील अमृतवाहिनी कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या त्या संचालक देखील आहे. सातत्याने त्यांच्या राजकी प्रवेशाची चर्चा होत असते. मात्र त्यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केलेला नाही.

Rasika Jadhav

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

3 days ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

3 days ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

3 days ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

3 days ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

3 days ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

3 days ago