34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने पाणी पुरवठा योजनेसाठी 68 लाख 96 हजार निधी मंजूर

बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने पाणी पुरवठा योजनेसाठी 68 लाख 96 हजार निधी मंजूर

टीम लय भारी

संगमनेर :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटातही तालुक्यातील विविध गावा करीता सातत्याने निधी मिळविला असून त्यांच्या पाठपुराव्याने ओझर खुर्द येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 68 लाख 96 हजार 672 रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे (Approved funds for water supply scheme on the initiative of Balasaheb Thorat).

याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटातही तालुक्यातील वाडी-वस्तीवर विकासासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. याचबरोबर संगमनेर शहर व तालुक्यासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीत एकमत नाही, या जागांवर होणार पुन्हा चर्चा

जम्मूतील हवाई दलाच्या तळावर अतिरेकी हल्ला

Approved funds for water supply scheme Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात

ओझर खुर्द नळपाणी पुरवठा योजनेसाठी बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत 68 लाख 96 हजार 672 रुपयांचा निधी मिळवला आहे. यामुळे ओझर गावचा पाणीपुरवठा योजना सुरळीत होणार असून गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे मुबलक व स्वच्छ पाणी मिळणार आहे. संगमनेर तालुक्यातील विकास कामांचा वेग व घोडदौड कायम असून अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका असूनही प्रत्येक गावच्या वाडी-वस्तीवर सातत्याने कामे सुरू आहेत (Despite being the largest taluka in Ahmednagar district, work is continuously going on in every village).

आव्हाड साहेब तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?

Maharashtra: 35 sarpanchs died of C .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/83935100.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

याचबरोबर दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाने ही अत्यंत गती घेतली आहे. हे ऐतिहासिक कामही लवकर मार्गी लागणार असून पुढील वर्षीच्या पावसाळ्यात दुष्काळग्रस्तांना या कालव्यांद्वारे निश्चित पाणी मिळेल असा विश्वास व्यक्त करत केला आहे.

ओझर खुर्द येथे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळवून दिल्याबद्दल ओझर गावातील नागरिकांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, इंद्रजित थोरात, शांताबाई खैरे, विजय हिंगे यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी