राजकीय

अजित पवारांना राज्यपालांनी मारली कोपरखळी

टीम लय भारी

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागताला पालकमंत्री आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी कोपरखळी मारली ( Bhagat singh Koshyari jibed to Ajit Pawar ).

‘आपके राज्य में हम आपकी बिना परमिशन के आ गए है’, असे राज्यपालांनी अजितदादांना म्हटले. अजित पवारांनीही हात जोडून ‘असे काही नाही’ म्हणत स्वागत केले. अजित पवारांचा पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर वचक आहे. राज्यपाल कोश्यारी यांनाही हे माहिती आहे.

राज्यात सध्या पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील ‘संघर्ष’ वादाचे स्वरूप घेऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पवार कुटुंबियांमध्ये मोठ्या प्रमाणावर बैठका सुरु आहेत. पार्थ पवार यांच्या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांकडून विजयसिंह मोहिते पाटलांना ‘डोस’

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 7 मंत्री ‘कोरोना’बाधित

पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ, ५ सप्टेंबरपर्यंत नवी मुदत

देवेंद्र फडणविसांना जमले नाही, ते आदित्य ठाकरेंनी करून दाखविले

देवेंद्र फडणविसांचे बोलून झाले, अन् अजितदादांनी फवारा मारला

अजितदादा म्हणाले, जयंत पाटील माझ्यावर कारवाई करतील

यावरून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. यानंतर तातडीने अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. तसेच शुक्रवारीही बैठकांचे सत्र सुरु होते.

शनिवारी राज्यपाल कोश्यारी यांनी पुण्यात शासकीय ध्वजारोहण केले. विधानभवन, पुणे येथे हा सोहळा पार पडला. राज्यपाल ध्वजारोहण सोहळ्यासाठी पोहोचले असता त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. राज्यपालांच्या या टोल्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

 

तुषार खरात

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago