राजकीय

विधान परिषद निवडणूकीत मतदारांचा भाजपला कौल

टीम लय भारी

विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल हाती लागले. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता(BJP: Voter turnout in Legislative Council elections)

त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली.

तब्बल 20 महिन्यांनंतर मुंबईत शाळा पुन्हा सुरू झाल्या..

Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया  आणि भाजपचे वसंत खंडेलवाल  यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी झाले. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झालेत.

अकोल्यात गोपिकिशन बाजोरिया गेल्या तीन टर्मपासून आमदार होते. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातोय. तर नागपूरमध्ये भाजपचे बावनकुळे विजयी झालेत. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिला. मात्र, देशमुख पराभूत झाले.

रुपाली ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘Data-Driven Governance To Ensure Last-Mile Delivery, Transparency: PM Modi To 12 BJP CMs In Varanasi 

देशमुख यांचा परावभाने काँग्रेसला मोठा झटका बसलाय. वसंत खंडेलवाल यांना ४४३मते मिळाली आहेत तर गोपिकिशन बजोरिया यांना ३३४ मते मिळाली असून  खंडेलवाल यांनी ही निवडणूक ११० मतांनी जिंकली. नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती, तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर  यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलं होतं.

काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, भाजपच्या नियोजनाला यश आलं. बावनकुळे यांना ३६३ मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago