31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजRailway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

टीम लय भारी

Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत करिअर, नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. आरआरसीने लेव्हल ५/४, ३/२ साठी होणाऱ्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात(Central Railway: Registration process for recruitment starts from today)

१३ डिसेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया २७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

लाल केळीचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

रुपाली ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शैक्षणिक पात्रता काय?

लेव्हल ५/४: जर तुम्हाला या लेव्हलसाठी अर्ज करायचा असेल, तर उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

लेव्हल ३/२ : या स्तरासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १२वी पास असावा. याशिवाय १०वी पास प्लस कोर्स असलेले देखील अर्ज करू शकतात.

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, कसा असेल नवीन स्मार्टफोन

Railway Recruitment 2021: Registration for several vacancies begins at rrccr.com, check important details here

किती पदांसाठी होणार भरती?

रेल्वेच्या या भरतीअंतर्गत २१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये लेव्हल ५/४ ची ३ पदे रिक्त आहेत आणि लेव्हल ३/२ ची १८ पदे रिक्त आहेत. अर्जदाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. १ जानेवारी २०२२ पासून वयाची गणना केली जाईल.

निवड प्रक्रिया काय आहे?

४० पैकी २५ किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारे उमेदवारच पुढील टप्प्यातील मूल्यमापनासाठी पात्र असतील. अधिक तपशीलांसाठी अधिकृत सूचना पहा.

अर्ज फी किती?

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, PWD आणि महिलांसाठी अर्ज फी रु. २५० आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी