पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसकडून ‘ही’ खास भेट!

लयभारी टीम

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) देशात जोरदार आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन थांबण्याची चिन्हे दिसत नाही. यावरून काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला. देशात, समाजात विभाजन घडवलं जात आहे असा आरोप काँग्रेसने केला. प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यघटनेची प्रत भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्त्यावर Amazon वरून ही पाठविण्यात आली. त्या

ची 170 रुपये किंमत आहे. देशात फुट पाडण्याच्या तुमच्या कामातून वेळ मिळाला तर हे पुस्तक जरूर वाचा असा खोचक आणि बोचरा सल्लाही काँग्रेसने मोदींना दिला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचं हे प्रचार युद्ध चांगलंच रंगणार आहे. काँग्रेसने ट्वीट करून ही टीका केली. राज्यघटनेचं पुस्तक लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

पंधरा डिसेंबरपासून राजधानी दिल्लीतील ‘शाहीन बाग’ परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू होऊन जवळपास पंचेचाळीस दिवसाचा कालावधी झाला आहे. अजून किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही. जोपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा परत घेतल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा चंग शाहीन बाग आंदोलनकर्त्यांनी बांधला आहे.

या आंदोलनामध्ये महिला बालक आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. महिला या समाजातील पहिल्या घटक आहे, हे समजुन या आंदोलनात जे धरणे प्रदर्शन सुरू आहे. त्या धरणे प्रदर्शनात सर्वात प्रथम महिला बसलेल्या आहेत. या महिलांमध्ये मुली तरुणी आणि वयोवृद्ध महिला सहभागी झालेल्या आहेत. यांच्यासाठी येथे हे मंडप टाकण्यात आलेला आहे. या मंडपाच्या आत थंडीची पर्वा न करता या महिला आंदोलन करत आहे. हे विशेष.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून केरळ, पंजाब, महाराष्ट्र,बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश,पश्चिमबंगाल या राज्यांनी विरोध केला आहे. मात्र, गृहमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सर्वोच्च न्यायालयात 144 याचिका दाखल असून सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यात केंद्राला वेळ मागितला आहे.

राजीक खान

Recent Posts

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

46 mins ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

1 hour ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

3 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

3 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago