राजकीय

अमृता फडणवीस-विद्या चव्हाण वादात देवेंद्र फडणवीसांची उडी,म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मध्ये ओढत त्यांना डान्सिंग डॉल असे संबोधले.(Devendra Fadnavis jumps into Amrita -Vidya  controversy)

 अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिलांबाबत बोलताना काळजी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

मोदींचे सभास्थान मोकळेच राहिले, हीसुद्धा देवाचीच कृपा म्हणायची का?;शिवसेनेचा टोला

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला कोणतीही असो त्यांच्याबदद्ल बोलताना काळजी घेतली पाहिजे. केवळ पक्षांनीच नाही तर महिलांबाबत वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळायला हवी.

विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या…

भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख जितेन गजारिया याने एक वादग्रस्त ट्वीट केले. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने राबडीदेवीचे उदाहरण दिले, असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. राबडीदेवीला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावे वाटते, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.

मोदींना महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार हवे होते, पण मी नाही म्हणालो : शरद पवार

https://www.indiatoday.in/law/story/bombay-high-court-former-maharashtra-cm-devendra-fadnavis-bank-a

अमृता फडणवीसांनी दिले विद्या चव्हाणांना हे उत्तर…

अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाणांना उत्तर दिले. शिवाय त्यांना अब्रुनुकसानीची नोटीस धाडली. त्यानंतर एक ट्वीट केले. त्यात त्या म्हणतात, आपल्याच सुनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे @NCPspeaks नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! @Vidyaspeaks मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण !

Team Lay Bhari

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

13 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

16 hours ago