मुंबई

ठाणे ते दिवा दरम्यान 36 तासांचा मेगाब्लॉक, एक्स्प्रेसही रद्द

टीम लय भारी

मुंबई : ठाणे आणि दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीनं करण्यात येत आहे. या निमित्तानं ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक आज शनिवार 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान सुरु राहील. आज दुपारी दोन वाजल्यापासून ब्लॉक सुरु होईल. तो ब्लॉक सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरु राहील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहेत(Megablock for 36 hours between Thane to Diva).

ब्लॉक दरम्यान ठाणे कल्याण दरम्यान धिमी लोकल सेवा बंद

मध्य रेल्वेनं जाहीर केलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमध्ये ठाणे ते कल्याण दरम्यान एकही लोकल ट्रेन धावणार नाही. या मार्गिकेवरील जलद लोकल सेवा मात्र सुरु असणार आहे. ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणरा आहे.36 तासाात मुख्य मार्गावरील 390 लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत. फास्ट लोकल सुरु ठेवण्यासाठी लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मुंबई लोकल प्रवासावर सरसकट निर्बंध नाही…

लवकरच, प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमध्ये चित्रपट, संगीताचा आनंद मोफत घेता येणार

या ट्रेन्स रद्द?

7 आणि 8 जानेवारी

अमरावती एक्स्प्रेस, नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस

8 जानेवारी आणि 9 जानेवारी

जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, अदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस, डेक्कन क्विन एक्सप्रेस, मुंबई अमरावती एक्स्प्रेस, नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, गदग एक्स्प्रेस, नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस

9 आणि 10 जानेवारी

अदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस,गदग एक्स्प्रेस

पुण्याला प्रवास संपणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या

हुबळी दादर एकस्प्रेस, कोयना एक्स्प्रेस

पुण्याहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या

हुबळी दादर एकस्प्रेस, कोयना एक्स्प्रेस

दादर स्थानकाचे छत 600 झाडांसारखे असणार!

From Today; 390 Local Train Services, 18 Indian Railways Passenger Trains to be Affected; Check Details

लोकल सेवेतील आजचे बदल

आज शनिवारी दुपारी 1 ते 2 दरम्यान कल्याणहून सुटणाऱ्या अप धिम्या अर्ध जलदल लोकल कलण्याण ते माटुंगा रम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेतय यादरम्यानं ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थनाकवर थांबा नसेल.

Team Lay Bhari

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

12 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

12 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

12 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

12 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

13 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

14 hours ago